पुणे : आजच्या काळात प्लास्टिक पुनर्वापर (plastic recycling ) मोठी समस्या बनली आहे. पर्यावरणासाठीही प्लास्टिक घातक ठरले आहे. या प्लास्टिकमुळे जगाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणातील प्रदूषणाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्लास्टिक आहे. कारण प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते शेकडो वर्षे वातावरणात राहते. पाण्यापासून हवेपर्यंत प्लास्टिक घातक ठरत आहे. अशा या घातक प्लास्टिकपासून काही करता येणे शक्य आहे का? प्लास्टिकच्या विघटनासाठी अनेक जण संशोधन करत आहे. पर्यावरणासाठी घातक असल्यामुळे त्याच्या बंदीवरही चर्चा होत असते. परंतु या प्लास्टिकचा पर्याय दाखवण्यात आला आहे. पुण्यातील एकाने स्टार्टअपने हे करुन दाखवले आहे.
This has been the hardest thing I have ever been a part of.
हे सुद्धा वाचाFinally: Presenting the world's first recycled sunglasses made from packets of chips, right here in India! pic.twitter.com/OSZQYyrgVc
— Anish Malpani (@AnishMalpani) February 16, 2023
सनग्लासची निर्मिती
प्लास्टिकचा पुनर्वापर करत करुन चक्क सन ग्लासेसची निर्मिती केली जात आहे. चीप पॅकेटपासून बनवलेले सनग्लासेस बाजारात उपलब्ध झाले आहे. आशाया नावाच्या या कंपनीचे सहसंस्थापक अनिश मालपाणी यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या कंपनीने कसा चमत्कार केला आहे हे सांगितले आहे. कंपनीने विदाऊट नावाच्या सनग्लासेसची रेंज बाजारात आणली आहे, त्याची विशेषता म्हणजे ही रेंज पुर्ण प्लास्टिकच्या चिप्सपासून बनलेली आहे.
मुलांना कशी मिळते मदत
व्हिडिओ शेअर करताना अनिशने लिहिले की, ही सर्वात कठीण गोष्ट आहे ज्याचा मी भाग होतो. चिप्स पॅकेट्सपासून बनवलेला हा जगातील पहिला रिसायकल केलेला सनग्लासेस आहे. तो भारतात बनवला जाता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलीने सांगितले की कंपनी कचऱ्या जमवणाऱ्या मुलांची कशी मदत करत आहे, यामुळे ही मुले चांगल्या शाळेत जात आहे.
मुलांना चांगले शिक्षण मिळणार आहे. त्याचे श्रेय प्लास्टिकच्या पुनर्वापर करणाऱ्यांना जाते. कारण ही कंपनी प्लास्टिक गोळा करण्यासाठी त्यांनी चांगला मोबदला देत आहे. ही मुले या पैशांचा वापर शिक्षणासाठी करत आहे प्लास्टिक वितळून त्याला जाड केले जाते. त्यानंतर त्यापासून चष्मे बनवले जात आहे.
व्हिडिओची मोठी चर्चा
सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगली चर्चा सुरु आहे. या व्हिडिओला 44 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अनिशला शार्क टँकवर जाण्याचा सल्ला दिला आहे. एकाने सांगितले की, पुण्यात स्टार्टअप सुरू झाला आहे, याचा आनंद आहे. अनिशचे हे संशोधन पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपयोगी ठरणार आहे.