पुणे : माणसाची उंची नेहमी त्याच्या उंचीने किंवा सौंदर्याने नव्हे तर त्याच्या धाडसाने मोजली जाते. लाल बहादुर शास्त्री यांच्यांमुळेच मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी म्हण प्रचलित झाली. रायगडमधील 3.3 फूट उंचीच्या प्रतीक मोहितेने आपल्या कमी उंचीने नाहीतर कर्तबगारीमुळे नाव कमवले आहे. प्रतीक जगातील सर्वात लहान शरीरसौष्ठवपटू (worlds shortest bodybuilder) आहे. 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकतेच प्रतीकचे लग्न झाले आणि लोक त्याच्या लग्नासाठी अभिनंदन करत आहेत. प्रतीकने इंस्टाग्रामवर काही फोटो-व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात तो त्याच्या त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत आनंद लुटताना दिसत आहे.
कशी झाली ओळख
प्रतीक रायगडचा रहिवासी आहे आणि त्याची पत्नी पुण्यातील आहे. प्रतीकची उंची 3 फूट 34 इंच आणि पत्नी जयाची उंची 4 फूट 2 इंच आहे. प्रतीकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याची जयाशी ओळख करून दिली होती आणि त्यादरम्यान त्याला जया आवडली होती.
प्रतीक अन् जयाची भेट 2018 मध्ये झाली होती. परंतु प्रतीकने 2016 मध्ये बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली. जयाला भेटला तेव्हा तो फार यशस्वी झाला नव्हता. लग्न केल्यानंतर जयाची जबाबदारी पडणार होती. यामुळे आधी स्वत:च्या पायावर उभी राहीन आणि मग लग्न करेन, असे त्याने जयाला सांगितले. जयाही तयार झाली. हळूहळू वेळ निघून गेला. प्रतीकचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि तो फिटनेस ट्रेनर आहे. यामुळे त्याने जयाशी लग्न केलं.
हनीमून कुठे होणार
लग्नानंतर कुठे हनीमूनला जाणार असे प्रतिक विचारल्यावर तो म्हणाला, आमचे नुकतेच लग्न झाले आहे, आम्ही प्रथम कुलदेवाचे दर्शन घेऊ. मग जवळच्या पर्यटनस्थळी जाऊ. लग्नात खूप खर्च झाला आहे, आता मी थोडी बचत करेल अन् त्यानंतर हनिमूनला जाईन.
प्रतीकला जेव्हा विचारण्यात आले की, जया कोणती डिश चांगली बनवते, तेव्हा तो म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा जयाचा घरी गेलो तेव्हा तिने खूप चांगला महाराष्ट्रीयन स्वयंपाक केला होता. ती व्हेज बिरयानी चांगली बनवते, असे मला तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.