रवी खरात, रायगड | 6 नोव्हेंबर 2023 : जर एखादी गोष्टी करण्याचा निर्णय घेतला तर त्याला वयाचे बंधन नसते. मग नातवांशी खेळण्याचा वयात काही जण मोठी कामगिरी करुन दाखवतात. ८० ते ८५ या वर्षांत काही जण आयुष्यातील मोठे यश मिळतात. गावातील एखादा प्रश्न समोर आल्यावर त्यावर तोडगा काढण्यासाठी तरुणांनी नव्हे तर आजीबाईंनी कंबर कसली. या आजीबाईंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी यश मिळवण्याची तयारी केली. परंतु हे यश मिळवताना त्यांना नशिबानेही साथ दिली नाही. गावातील पाण्याच्या प्रश्नासाठी चिमणीबाई दाऊ खरात यांनी निवडणूक लढवली. एका तरुण महिला आणि त्यांना समसमान मते मिळाली. त्यानंतर ईश्वरी चिठ्ठी काढली. तेव्हा नशिबानेही आजीबाईंना साथ दिली नाही.
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात नंदनपाडा हे गाव आहे. रायगडपासून ५३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ८२५ आहे. गावात एकूण १७६ कुटुंब राहतात. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा चर्चा झाली. परंतु हा प्रश्न कोणाला सोडवता आला नाही. यामुळे ८५ व्या वर्षी आजीबाई चिमणीबाई दाऊ खरात यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस लावण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
आजीबाई चिमणीबाई खरात यांना बिनविरोध निवडून येण्याची अपेक्षा होती. परंतु गावातील दुसरी तरुण महिला त्यांच्यासमोर निवडणुकीच्या मैदानात उतरली. त्यानंतर आजीबाईंनी प्रचार सुरु केला. मतदानाचा दिवस आला. गावातील लोकांनी चांगले मतदान केले. आता मतमोजणीची वाट सर्व जण पाहत होते. सोमवारी मतमोजणी झाली तेव्हा चिमणीबाई खरात आणि प्रतिस्पर्धी उमेदवारास समान मते मिळाले. अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यात चिमणीबाई यांचा पराभव झाली. आजीबाईं यांनी जिद्द दाखवली पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही.