श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टलगत असलेल्या हरवित गाव हद्दीतील खाडीच्या किनार्यावर प्रचंड मोठ्या आकाराचा देवमासा (व्हेल मासा) मृतावस्थेत आढळून आला आहे.
समुद्रातील मोठ्या जहाजाची धडक लागल्यामुळे हा मासा मृत पावला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या महाकाय माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हा मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांब असून दिघी पोर्टकडे येणार्या तसेच समुद्रातून जाणार्या मोठ्या जहाजाच्या पंख्यामध्ये अडकल्याने हा मासा मृत झाला व समुद्राच्या प्रवाहासोबत किनार्यावर आला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हा मासा व्हेल प्रजातीचा असण्यासे सांगण्यात येत आहे.