रायगड : महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारल्याने अनेक ठिकाणी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. मात्र रायगडमध्ये बैलगाडी शर्यत सुरु असताना भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यात (Raigad) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काल (बुधवारी) सायंकाळी ही भीषण घटना घडली. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
रायगडमध्ये बैलगाडी शर्यत सुरु असताना भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तिघे जण जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरु होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला. ही घटना उपस्थित प्रेक्षकांच्या मोबाईल कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
संबंधित बातम्या :
भिर्रर्र चा नाद घुमणार ; जिल्हाधिकारी कार्यालयात 703 बैलगाडा मालकांनी केली नोंदणी
Video | ऐकावं ते नवलंच, पठ्ठ्याने बैलगाडीला बनवलं कार, व्हिडीओ पाहाच !
Aurangabad Rain | पुराच्या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न अंगलट, बैलगाडीच वाहून गेली