रायगड : समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना होंडा सिटी कार (Honda City Car)ने उसाच्या रसाच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघाता (Accident)त पादचारी महिलेला उडवल्याची घटना रायगडमध्ये माणगाव निजामपूर मार्गावर घडली आहे. रितू मोहिते पवार असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर माणगाव येथील माळी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघाताबाबत माणगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विक्रांत विघळूलकर असे होंडा सिटी कार चालकाचे नाव आहे. तर अनिल सकट आणि सुगंधा सकट अशी उसाच्या गाडी चालकांची नावे आहेत. वाहतूक कोंडीला कंटाळून समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला. (While overtaking a woman was hit by a Honda City car along with a sugarcane vehicle in Raigad)
विकेंड असल्यामुळे माणगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुण्यातील नाना पेठ येथील रहिवासी असलेले विक्रांत विघळूलकर हे माणगाव रोडवरुन आपल्या कुटुंबासोबत होंडा सिटी कारने प्रवास करीत होते. वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या विघळूलकर यांनी टेंबेवाडा समोर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. याच नादात रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या सकट यांच्या ऊसाचा रस विक्री गाडीला धडक बसून गाडीचा चक्काचूर झाला. याशिवाय रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी महिलेलाही धडक देत जवळास 200 मीटर फरफटत नेले. जखमी महिलेला माणगावमधील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या एमएच 12, एमएच 14 पासिंग असणाऱ्या वाहनचाकांकडून बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे पुणे दिघी राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा अपघात घडत असतात. (While overtaking a woman was hit by a Honda City car along with a sugarcane vehicle in Raigad)
इतर बातम्या
VIDEO : नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद