Railway canceled | दुष्काळात तेरावा…ऐन एसटी संपात भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या 18 गाड्या रद्द

| Updated on: Dec 23, 2021 | 9:32 AM

सावळ विभागाने मध्य रेल्वेच्या मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या 18 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमान्यांचे हाल होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या आणि तुमच्या प्रवासाची आखणी करता.

Railway canceled | दुष्काळात तेरावा...ऐन एसटी संपात भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या 18 गाड्या रद्द
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः एक अतिशय महत्त्वाची बातमी. तुम्ही कुठे बाहेर फिरायला जायचे नियोजन करत असाल, काही महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार असाल अथवा काही ऑफिसची टूर असेल, तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. कारण सध्या एकीकडे एसटी संपाचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. दुसरीकडे भुसावळ विभागाने मध्य रेल्वेच्या मनमाड-नाशिकमार्गे जाणाऱ्या 18 गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमान्यांचे हाल होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या आणि तुमच्या प्रवासाची आखणी करता. अन्यथा हाल अटळ आहेत.

या गाड्या रद्द…

सध्या नांदगाव रेल्वेस्थानकात दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे या गाड्या रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. त्यात 24 डिसेंबर, शुक्रवारी धावणारी हावडा-मुंबई (क्रमांक 12780), 26 डिसेंबर, रविवारी धावणारी मुंबई-हावडा (क्रमांक 12869) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी, 24 डिसेंबर रोजी धावणारी हालिया-कुर्ला (क्रमांक 12812), 26, 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे रविवारी व सोमवारी धावणारी कुर्ला-हालिया (क्रमांक 12811) या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 28 डिसेंबर, मंगळवारी धावणारी पुरी-कुर्ला (क्रमांक 22866), 30 डिसेंबर, गुरुवारी धावणारी कुर्ला-पुरी (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 23 व 27 डिसेंबर रोजी अनुक्रमे गुरुवार व सोमवारी धावणारी भुवनेश्वर-कुर्ला (क्रमांक 22865) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. 25 व 29 डिसेंबर रोजी अनुक्रमे शनिवार व बुधवारी धावणारी कुर्ला-भुवनेश्वर (क्रमांक 12879) ही गाडीही रद्द करण्यात आली आहे. या गाड्याच्या संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक जरूर पहावे.

नाशिक-कल्याण मेमू लोकल कधी?

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

नाशिकहून मुंबईला या गाड्या

नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आहेत. जानेवारीपासून गाडी सुरू झाली तर त्यात नाशिक-कल्याण मेमू लोकलची भर पडणार आहे. 1 नोव्हेंबर 1975 रोजी नाशिकरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. या गाडीने नाशिकच्या सर्वांगिण विकासात मोठी भर घातली. या गाडीने रोज जवळपास 1000 जण प्रवास करतात.

इतर बातम्याः

खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

Health University Admission| आरोग्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू; कसा कराल अर्ज, जाणून घ्या माहिती…!