Rain Update : यंदा पावसाचा असाही विक्रम, 1901 नंतर नीचांकी पाऊस, आता हवामान विभागाने दिले अपडेट

| Updated on: Aug 31, 2023 | 9:37 AM

IMD Weather forecast : यंदा पावसाने सर्वांचा जीव टांगणीला लावला आहे. इतिहासात सर्वात उष्ण महिना आणि 122 वर्षानंतर सर्वात कमी पाऊस असणारा महिना ऑगस्ट ठरणार आहे. परंतु हवामान विभागाने आता महत्वाची माहिती दिली. त्यामुळे दिलासा मिळणार का?

Rain Update : यंदा पावसाचा असाही विक्रम, 1901 नंतर नीचांकी पाऊस, आता हवामान विभागाने दिले अपडेट
Follow us on

पुणे | 31 ऑगस्ट 2023 : यंदा ऑगस्ट महिना सर्वात कमी पावसाचा महिना राहिला आहे. 1901 नंतर यंदा सर्वात कमी पाऊस झाला आहे. अल निनोचा हा परिणाम आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपले आहे अन् फक्त जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झालेला नाही. पूर्वोत्तर राज्य आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड वगळता देशात यंदा सर्वत्र पावसाची तूट आहे. यामुळे सरासरी तापमान 27.55 डिग्री सेल्सियस राहिले आहे. यामुळे इतिहासातील सर्वात हॉट महिना यंदाचा ऑगस्ट म्हटला जाणार आहे.

संपूर्ण महिन्यात फक्त चार दिवस पाऊस

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फक्त चार दिवस पाऊस झाला आहे. यंदा पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्ट महिन्यातील 27 दिवस सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा हा तिसरा ब्रेक आहे. तसेच या महिन्यात 33% कमी पाऊस झाला आहे. आता ऑगस्ट महिन्यातील ही कमतरता सप्टेंबर महिन्यात भरुन निघणार का? हा प्रश्न आहे.

हवामान विभागाला आशा

राज्यात ऑगस्ट महिन्यात जेमतेम 40 टक्केच पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच महसूल विभागात ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला. नेहमी मुसळधार पाऊस कोसळणाऱ्या कोकणात यंदा फक्त 43 टक्केच पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला. आता जोरदार पावसासाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालचा उपसागरात तयार होत आहे. यामुळे येत्या पाच सप्टेंबरपासून किंवा त्यानंतर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने नाकारली नाही.

हे सुद्धा वाचा

अन निनो काय आहे

अल निनो ही वातावरणाची एक स्थिती आहे. अल निनोमुळे समुद्राचे पाणी उष्ण होते. यामुळे कमी पाऊस पडतो. अल निनो मान्सूनला रोखून धरतो. स्कायमेट या संस्थेने यंदा अल निनोचा प्रभाव असणार असल्याचे यापूर्वीच म्हटले होते. कमी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक झालेला नाही. राज्यातील मोठे प्रकल्प भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची गरज आहे. अन्यथा यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असणार आहे.