IMD Rain Update: ब्रेकनंतर पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान विभागाने दिले महत्वाचे अपडेट

| Updated on: Sep 22, 2024 | 10:29 AM

imd prediction: अंदमानला निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याकडे सरकणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रीय होणार आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

IMD Rain Update: ब्रेकनंतर पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान विभागाने दिले महत्वाचे अपडेट
Imd
Follow us on

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. सोमवारपासून दमदार सरींचा वर्षाव होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अंदमानला निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याकडे सरकणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रीय होणार आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच 24 तारखेला नागपूरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलीच उसंत घेतली होती. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले होते. ऑक्टोंबर हिट जाणवत होती. नागपूर शहरातील तापमान 35°c च्या जवळ पोहोचले होते. सामान्यापेक्षा तीन डिग्रीने अधिक तापमान झाल्यामुळे नागपूरकर उकाड्याने त्रस्त झाले आहे. परंतु आता हवामान विभागाने पुन्हा एकदा येलो अलर्ट जाहीर केल्याने पावसाकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात २६ ते ३० ऑक्टोंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यात अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून आज आणि उद्या नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी दिला आहे. परभणीत पावसाला सुरुवात झाली आहे.

उजनी भागात ढगफुटी सदृष्य पाऊस

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस झाला. उजनी भागात ढगफुटी सदृष्य पाऊस आहे. उजनी गाव लगतच्या ओढ्याला पूर आला आहे. उजनी ते मासूर्डी रस्ता पाण्याखाली गेला आहे. उजनी ते एकंबी हा रस्ताही पाण्याखाली गेला आहे.

वाशिम जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर आणि हळद पिकाला चांगला फायदा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात मागील 10 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज होती. आता जोरदार पाऊस झाल्यामुळे या पिकांना आधार मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.