राष्ट्रवादीला पक्षच मानत नाही, शरद पवार नेहमी… राज ठाकरे यांची टीका काय?

| Updated on: Mar 09, 2024 | 1:14 PM

MNS Vardhapan Din and Raj Thackeray: आपल्याकडे विचार करणं हे काम आहे. हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ करू त्यालाच मेहनत मानतात. पण विचार करणं याला मेहनत मानत नाही. काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग असतो. काही वेळा काही गोष्टी सांगता येत नाही.

राष्ट्रवादीला पक्षच मानत नाही, शरद पवार नेहमी... राज ठाकरे यांची टीका काय?
राज ठाकरे, शरद पवार
Follow us on

चंदन पुजाधिकारी, नाशिक | दि. 9 मार्च 2024 : भाजप १९५२ मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आला. परंतु राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून आलेल्या लोकांची मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आहे. जे जे निवडून येतात त्यांना सोबत घेतात आणि सांगतात हा माझा पक्ष आहे. वेगळे झाले तरी निवडून येणारेच. खऱ्या अर्थाने कोणते पक्ष स्थापन झाले असेल तर त्यात जनसंघ, शिवसेना आणि मनसे यांचे नाव घ्यावे लागणार आहे. या पक्षामधील नव्याण्णव टक्के लोकांचा राजकारणाशी कधीच संबंध नव्हता. अनेकजण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हते. ते मनसेत आले. हजारो तरुण, तरुणी असे या पक्षात आले. ते नावारुपाला आले आहेत. तुमच्यातील अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील. पण त्यात तुमचा पेशन्स महत्त्वाचा आहे, असे मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

राम गणेश गडकरी यांचे दिले उदाहरण

पक्ष चालवताना हातपाय हलवले तरच मेहनत समजतात. जुनी गोष्ट आहे. राम गणेश गडकरी हे कोकणाच्या घरात होते. घरं उघडी होती. एक माणूस त्यांना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं गडकरी बसलेले. त्याने दरवाजाला टकटक केली. तो म्हणाला मी लांबून आलोय गडकरींना भेटायचं आहे.

पत्नीने त्यांना वऱ्हांड्यात बसवलं. अर्ध्या तासाने त्याने परत दरवाजा ठोठावला. पत्नी म्हणाली, सांगितलं मी त्यांना तुम्ही बसा. तुम्ही कळवलं का त्यांना, असं त्यानं विचारलं. पत्नीने सांगितलं हो मी त्यांना कळवलं. तो म्हणाला, ओ बाई कशाला खोटं बोलता. कामात आहेत कामात आहेत. ते तर नुसते बसलेले आहेत. ती म्हणाली, ते जेव्हा बसलेले असतात ना तेव्हाच ते कामात असतात.

हे सुद्धा वाचा

काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग

आपल्याकडे विचार करणं हे काम आहे. हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ करू त्यालाच मेहनत मानतात. पण विचार करणं याला मेहनत मानत नाही. काही गोष्टी स्ट्रॅटेजीचा भाग असतो. काही वेळा काही गोष्टी सांगता येत नाही. नशिब महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता. आजचे पत्रकारही नव्हते, असा टोला राज ठाकरे यांनी सोशल मीडियातील चर्चेबाबत केला.

हे ही वाचा

प्रत्येकाला टाकला वडा, आला तळून असं वाटतंय; राज ठाकरे यांनी शायनर कार्यकर्त्यांना झापलं