शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य

| Updated on: Mar 30, 2025 | 9:16 PM

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं

शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं, त्यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर. या हिंद प्रांताची काय अवस्था होती. सर्व जातीचे लोक कुणा ना कुणाकडे होते ना कामाला? शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीतच होते ना. त्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता. परिस्थिती वेगळी होती. त्यांनी का असा निर्णय घेतले होते. जे कोणी राज्यातील संरजामदार होते त्यांच्या विरोधात महाराजांचा लढा होता.  त्यांना जातीत का पाहता, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अफजल खानचा वकील कुलकर्णी होता. ब्राह्मण होता. अफजल खानाशी बोलणी करणारा शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राह्मणच होता. तेव्हा वेगवेगळी माणसं एकमेकांकडे कमावर होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर नाही. त्यावेळी काय निर्णय घेतले, काय परिस्थिती होती आपल्याला काय माहिती. ३०० ते ४०० वर्षापूर्वींचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय जातीपातीत. आग्र्याच्या दरबारात महाराजांच्यासमोर संभाजी महाराज असताना. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच हजाराची मनसबदारी स्वीकारली होती. महाराजांचा होकार असल्याशिवया हे शक्य होईल? आपण दरबारात अडकलो. स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू नंतर पाहू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय आहे. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण पाहणार की नाही.

शिवाजी महाराजांकडे औरंगजेबाचा माणूस मिर्झा राजे जयसिंग आला तो हिंदू होता. तानाजी मालुसरेंचा लढाईत मृत्यू झाला. ते उदयभानासोबत लढले. ते दोघेही हिंदू होते. आपण कोणत्या काळात जगतो. शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ वेगळा होता. नंतरचा काळ वेगळा होता, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.