लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांचे पहिल्यांदा थेट भाष्य, ही योजना म्हणजे…

| Updated on: Aug 24, 2024 | 12:57 PM

raj thackeray press conference: महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहे. परंतु या योजनेचा पहिला आणि दुसरा महिना कदाचित दिला जाईल. त्यानंतर सरकारकडे पैसे कुठे आहेत. अजितदादांनीही सांगितले आहे की निवडून दिले तरच.

लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांचे पहिल्यांदा थेट भाष्य, ही योजना म्हणजे...
Raj Thackeray
Follow us on

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु आहे. महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे पहिले दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमासुद्धा झाले आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे मतदान होईलच हे सांगता येणार नाही. ही योजना जास्त काळ चालणार नाही. दोन, तीन महिन्यांत ही योजना बंद होईल. सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत कुठे? लोकांना असे फुकटाचे पैसे नको आहेत. त्याऐवजी तुम्हा काम द्या. शेतकऱ्यांना मोफत वीज नको. त्यांना शेतमालास भाव हवा आहे. करदत्यांचा हा पैसा आहे. यामुळे लोकांना फुकट काही देण्याऐवजी रोजगार द्यावा, असे रोखठोक भाष्य राज ठाकरे यांनी केले.

लोकांना काम हवे…

नागपुरात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मध्य प्रदेशात यश मिळाले ते केवळ लाडकी बहिणीमुळे मिळाले, असे नाही. त्याला इतरही कारणे असतील ना. पहिला आणि दुसरा महिना कदाचित दिला जाईल. त्यानंतर सरकारकडे पैसे कुठे आहेत. अजितदादांनीही सांगितले आहे की निवडून दिले तरच. पहिल्या हप्त्याची सही असेल. लोक काम मागत आहेत. ते फुकटचे पैसे मागत नाही. शेतकरी वीज मोफत मागत नाही. त्यांना त्या अखंड विजपुरवठा हवा आहे. आता जे पैसे दिले जात आहेत. तो लोकांचा कर आहे. राज्यात असंख्य नोकऱ्या आहेत. परंतु त्याची माहिती राज्यातील युवकांपर्यंत जात नाही. बाहेरच्या राज्यातील युवकांना कळते की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने दिले जात आहे. ही कोणती पद्धत आहे? असे राज ठाकरे यांनी म्हटले.

पैसे दिले तरी मतदान होईल असे नाही

लोक खूप हुशार आहेत. त्यांना पैसे मिळत असतील तर नक्की घेतील. पण मतदान करणार नाही. कोणी तरी मला सांगितले, की मतदानाच्या दिवशी कोल्हापुरात दरवाजावर पिशवी लावलेली असते. जेवढे मतदार तेवढे पैसे त्या पिशवीमध्ये ठेवलेले असतात. अशा तीनचार पिशव्या असतात. त्यामुळे कुणी कुणाला मतदान केले कसे कळणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे उपोषणाला बसले तेव्हा लाठीमार झाला. पण कारवाई पोलिसांवर झाली. पोलिसांना सूचले की लाठीचार्ज करायाचे. पोलीस म्हणतील मरू देत. आम्ही पुढाकार घेतल्यावर आमच्या अंगलट येते तर कशाला. पोलिसांनी एखादा पुढाकार घेतला तर सरकारने त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ही सुद्धा वाचा…

राज ठाकरे यांचा शरद पवारांवर मोठा हल्ला, फोडाफोडीचे राजकारण अन् जातीचे राजकारण…