राज्यातील फोडाफोडीचे आणि जातीपातीच्या राजकारणास शरद पवार जबाबदार आहे. त्यांनी त्याची सुरुवात केली, असा घाणाघाती हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. विदर्भातील दौऱ्यात बोलताना नागपूरमधून राज ठाकरे यांनी हे आरोप केले. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करताना फोडाफोडी केली. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात राज्यात शरद पवार यांनी सुरु केले. तसेच जातीचे विष देखील त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या जन्म झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण पाहा. त्यापूर्वीच्या काळात कधी संत आणि कधी महापुरुषांची विभागणी झाली नव्हती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच हा प्रकार सुरु झाला.
महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राचा पुनरावृत्ती होत आहे. जाती वाद फोडफोडी सुरू झाली. शरद पवार यांनी त्याची सुरवात पुलोदपासून केली. फोडा फोडीचा राजकारण आणि जातीच राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. संत महापुरुष जाती जातीत कधीच विभागले नव्हते ते 1999 पासून सुरू झाले. हा विषय सगळ्यांनी बंद केला पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि महायुतीला झालेले मतदान आपण समजून घेतले पाहिजे. त्यावेळी भाजपच्या विरोधात मुस्लिम लोकांनी मतदान केले. संविधान बदलणार म्हणून भाजप विरोधात दलित समुदायाने मतदान केले. त्या काळात झालेले मतदान मोदी आणि शहा विरोधात झाले होते. ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रेमासाठी मतदान नव्हते. गेल्या पाच वर्षांत या लोकांनी राज्यात जे गलिच्छ राजकारण केले, ते राजकारण महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने कधीही विचार केला नसेल की महाराष्ट्रात असे राजकारण चालणार आहे.
मी यापूर्वी सांगितले होते निवडणुकीच्या आधी हाणामाऱ्या सुरू होतील, त्याची झलक आपण लोकसभेत काहीशी पहिली आता पुन्हा दिसेल. आमच्यासाठी वातावरण पोषक आहे. लोक राजकारणाला कंटाळले आहे. दिवाळी नंतर विधानसभा निवडणूक लागतील असे वाटत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा…
लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांचे पहिल्यांदा थेट भाष्य, ही योजना म्हणजे…