Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला राज्यसभेचा उमेदवार घोषित करणार
ग्रामीण भागातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधुन उमेदवाराची निवड होणार
मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीसाठी पक्षातील काही निष्ठावंतांची नावेही तयार ठेवली आहेत
छत्रपती संभाजी राजे यांना उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वाजता ‘वर्षा’ येथे शिवबंधन बांधण्यासाठी येण्याचा निरोप दिला आहे.
छत्रपती संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष
अश्लील चाळे केल्याचा महिलेचा आरोप
महिलेच्या आरोपावरून प्रवाशांकडून एकाला मारहाण
रत्नागिरी- रत्नागिरी दिवा पॅसेंजर मधून पडून मुंबई पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
सुट्टी निमित्त दापोली येथील टेटवली येथे आला होता
खेड रेल्वे स्थानकातून पुन्हा रत्नागिरी दिवा पॅसेंजरने मुंबईला परतत असताना सुकीवली गावानजीक रेल्वेतून पडून गंभीर जखमी
अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने मुंबईला हलवले
उमेश पांडुरंग भोसले असे रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे
उन्हाळी सुट्टी मुळे कोकण रेल्वे गाड्या गर्दीने खचाखच भरल्या आहेत , दरवाजा शेजारी हा कर्मचारी उभा असल्याने धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे
वसमत येथील नांदेड रोडवरील होरो कंपनीच्या मोटारसायकल बिल्डिंगच्या तळमजल्याला आग
घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल
चोरटा मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नालासोपारा पश्चिम समेळपाडा गावातील लिटिल फ्लावर शाळेमागे श्री शक्ती सोसायटीत असलेल्या स्मार्ट मोबाईलच्या दुकानात ही चोरीची घटना घडली आहे.
दुकानातील महिला कर्मचारी झाडलोट करत असताना, तिचे लक्ष काऊंटर कडे नसल्याचा गैरफायदा घेऊन, समोरील एक मोबाईल घेऊन चोरटा फरार झाला आहे..
याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठकीची शक्यता
– पेनूर येथील माळी पाटी येथे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू
बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड साठवण डेपोला लागली आहे आग,
खबरदारीचा उपाय म्हणून बल्लारपूर-आष्टी मार्ग वाहतुकीसाठी केला बंद,
अग्निशमन दलाच्या बंबांचे आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू,
या आगीच्या स्थळाच्या अगदी शेजारी आहे पेट्रोल पंप, आग पेट्रोल पंपापर्यंत आग पोहचू नये यासाठी केले जात आहेत प्रयत्न,
वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल
नालासोपारा:- शनिवारी अपहरण झालेल्या मनोरुग्ण तरुणांचा नालासोपा-यात आज सापडला मृतदेह
नालासोपारा पूर्व कॅपिटल मॉल जवळ पावसाळा पूर्वीची नालेसफाई सुरू असताना मृतदेह सापडला आहे.
प्रदीप पन्नालाल उर्फ शाहरुख खान असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.
हा तरुण मनोरुग्ण होता. वसई च्या दिवणमान, समता नगर, अंबाडी रोड, वसई रोड स्टेशन परिसरात नेहमी फिरत होता. आपल्या वेगवेगळ्या स्टाईल ने लोक त्याला शाहरुख खान म्हणून ओळखत होते.
नागपूरच्या गोरेवाडा जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दल आणि वन विभागाला आलं यश
आग पसरण्यापासून रोखण्यात आलं यश
अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण
जंगलातील वाळलेल गवत आणि पाला पाचोळा असल्याने आग पसरत होती
वन विभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने आग आणली नियंत्रणात
आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही
मला त्यांचं महत्व वाढवायचं नाही
शरद पवारांना प्रश्न विचारता लगावला टोला
राज ठाकरेंवर बोलण्यास दिला नकार
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं उदघाटन..
– अजितदादांनी दिली शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राला भेट..
– कलिंगड उत्पादन आणि विक्रीसंदर्भात घेतली माहिती..
औरंगाबाद नाव संभाजीनगर झालं पाहिजे
राज ठाकरेनी आज मागणी केली आम्ही आधीपासून मागणी केलीय
राज ठाकरेना काय वाटतं ते सांगितलं , ते समर्थ आहेत
सचिन सावंत भाजपचा छुपा ट्रॅप आहे सांगण्याएवढे मोठे नाहीत
बृजभूषण यांना थांबवण्यासाठी काय केलं हे ओपनली सांगता येणार नाही
बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती
शरद पवारांनी खूप लाथा ब्राम्हण समाजाला मारल्या आता स्वारी बोलताय
पवारासाहेब न्यायलयाच्या वर झालेलं आहेत
छत्रपतीच्या पाऊखुणा असलेल्यांना प्रत्येक ठिकाणी छुपी बांधकाम सुरू आहेत
औरंगाबाद शहरात पाण्याची परिस्थिती कठीण त्यामुळे देवेंद्र फडणवीस मोर्चा काढणार आहेत
औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा योजना ही शिवसेनेमुळे पूर्ण झाली नाही
आमच्या मोर्चाला लोक पैसे घेऊन येणार नाहीत तर आक्रोश घेऊन येणार आहेत
औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालं पाहिजे हा मुद्दा आम्ही कधीही सोडला नाही
न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे
त्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही नाव बदलण्यासाठी प्रयत्न करू
हे हिंदूत्ववादी कधी झाली हे यांनी सांगावं
आमचं हिदूत्व हे आमच्याजवळ आहे
यांनी हिंदुत्वावर बोलू नये
हिंदुत्वाची शाल राज ठाकरेंनी कधी पांघरली
यांना वैफल्य, नैराश्य आहे
या सर्व लोकांना उपचाराची गरज आहे
राज ठाकरेंनी सोयीनुसार हिंदुत्वाचा मुद्दा उचलला
पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारकडे आहे
औरंगजेबाची कबर तोडून टाका तुम्हीला कुणी अडवलं आहे
कोणाचंही राजकारण मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याशिवाय पुढं जात नाही
आता एकावेळेला लाव रे तो व्हिडीओ
पंतप्रधानावरती तोंड सुख घेणारे तेच आहेत
युपीतल्या लोकांना सामावून घेणं
त्यांना सामावून घेणारा महाराष्ट्र
भोंगे उतरवल्याने पोटे भरत नाहीत
त्यांचे धंदे उद्ववस्त केलेत
युपीच्या मुख्यमंत्र्यासोबत राहा
औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्राने बांधलं
शरद पवारांचे बोट धरून चालणारे सुध्दा केंद्रात आहात
संदीप पाकिस्तानातून आल्यासारखे त्याला शोधत होते
शेवटी संदीपच्या बायकोने घरचा फ्रीज उघडून दाखवला की नाहीये तो…
पण किशोर शिंदे आणि आपल्या वकिलांच्या टीमने दाखवलेल्या कर्तव्यामुळे ही सगळी पोरं बाहेर निघाली.
आंदोलनं होतील.. काळजी नसावी.. टीम तयार आहे..
शस्त्रक्रिया झाल्यानंतर दीड-दोन महिन्यांनंतर मी पुन्हा समोर येणार आणि पुढची दिशा देणार
छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीसाठी फंडींग सुरु आहे
त्यावर महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा आहे, याचं आश्चर्य वाटतं
भोंग्याचा विषय काढल्यानंतर सकाळच्या अजान बंद झाल्या
जवळपास 92-94 टक्के ठिकाणी आवाज कमी झाले
पण बाबांनो, जोपर्यंत तुम्ही वेंधळ्यासारखे राहणार ना, तोपर्यंत हे असंच चालणार
शेतकऱ्यांना अख्खा ऊस पेटवून आत्महत्या केली, एक बातमी आली आणि संपलं
आम्हाला राग येत नाही, आम्हाला शरम नाही.. आम्हाला काहीही वाटत नाही
काहीही न करण्यामध्ये 900 वर्ष पारतंत्र्यात होता देश
बेसावध असल्यानं आपल्यावर आक्रमणं झाली
फक्त मोबाईल फॉरवर्ड बघण्यात आम्ही व्यस्त आहोत
लाऊडस्पीकर हे एका दिवसाचं आंदोलन नाही
सातत्य नसेल, तर पुन्हा हे सगळं सुरु होणार
हळूहळू आवाज पुन्हा सुरु होणार, हे तुम्हाला चेक करत आहेत
एकदाचा तुकडा पाडून टाका..
एक पत्र तुम्हाला येत्या काही दिवसांत देणार आहे..
प्रत्येक घराघरात हे पत्र पोहोचलं पाहिजे, हे एक आंदोलन आहे…
भोंग्यांच्या प्रकरणात 28 हजार मनसैनिकांना नोटिसा आल्या..
जो कायदा पाळा सांगतोय, त्याला नोटीस पाठवणार, तडिपार करणार
आणि जे पाळत नाही, त्यांच्यासोबत चर्चा करणार? यात चर्चा काय करायची?
बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवाताय तुम्ही- राज ठाकरे
राज ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार
मोठ्या साहेबांना आताचं सरकार बघून आनंद वाटला असता, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं
संभाजी नगरच नामंतर झालं, मी बोलतोय ना अस त्या दिवशी बोलले मुख्यमंत्री?
अरे पण तु कोण आहे ? उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी सुनावलं
औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदारही झाला- राज ठाकरे
एमआयएमला वाढवलं- राज ठाकरे
औरंगाबादेत शिवसेनेचा खासदार पडला- राज ठाकरे
शरद पवारांना औरंगजेब सूफी संत वाटत असेल, तर आश्चर्यच आहे! – राज ठाकरे
तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय?
महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे, याची महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती नाही, त्याची भरती महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये नाही..
महाराष्ट्रामध्ये भरती असेल तर संधी महाराष्ट्रातल्या लोकांना मिळायला हवी, यूपी बिहारमध्ये संधी असेल, तर तिथल्या लोकांना संधी मिळावी..
मग ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्यानंतर स्थानिक भाषेत परीक्षा घ्यायला लावल्या…
आंदोलन अर्धवट सोडण्याची टीका करणाऱ्यांनी टोल किती बंद पाडले याची आकडेवारी बघावी..
तेव्हा हिंदुत्वाची पकपक करणारे कुठे होते…
रझा अकादमीच्या लोकांनी हल्ला केला, तेव्हा आमच्या पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात घातला गेला, याच्याविरोधात आम्ही मोर्चा काढला..
उद्धव ठाकरेंनी एकच सांगावं, एकतरी केस आहे का ओ तुमच्या अंगावर…
भूमिकाच कोणती घ्यायची नाही! – राज ठाकरेंचा हल्लाबोल
खरं हिंदुत्व काय, खोटं हिंदुत्व काय? अरे काय कपडे धुवायची पावडर विकताय का?
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा सवाल
हिंदुत्वाचा रिझल्ट हवाय लोकांना आणि तो आम्ही देतोय
राज ठाकरेंना शिवसेनेवर हल्लाबोल
एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यातून चुकीचे पायंडे पडत आहेत..
विषय माफी मागण्याचाच आहे ना,.. मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचे एक गृहस्थ आहे
गुजरातमध्ये यूपी-बिहारच्या लोकांकडून बलात्कार झाला होता
तेव्हा रातोरात यूपी-बिहारच्या लोकांना हाकलवून लावलं गेलं, गुजरातमधून बाहेर काढण्यात आलं..
तिथे कुणाला माफी मागायला लावणार आहात?
हे आता कसं काय सुरु झालं अचानक?
आपल्या विरोध सगळे एकत्र येतात आणि इतरवेळी सगळे एकमेकांशी भांडत असतात..
राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणात…
मातोश्री बंगला काय मशिद आहे का?
मग काय त्यांना अटक करण्यात आली.. मधू इथे अन् चंद्र तिथे..
एवढ्या सगळ्या राड्यानंतर राऊत आणि राणा जेवताना दिसले..
शिवसेनेतल्या लोकांना याचं काहीच नाही वाटत का?
रामजन्मभूमीचं दर्शन तर मला घ्यायचं होतंच
शिवाय शरयू नदीत जिथं माझ्या कारसेवकांना मारलं, तिथंही मला ज्यायचं होतं
तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर..
तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं..
आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी, हे मी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंशी बोललो..
ऐन निवडणुकीवेळी या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या आणि तेव्हा निवडणुकीवेळी इथे कुणीच नसतं.
एक कुणीतरी खासदार उठतो आणि मुख्मयंत्र्यांना आव्हान देतो तिथल्या.. शक्य आहे का ओ?
या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत, काही बोलताही येणार नाहीत..
अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर दोन दिवसांचा बफर दिला होता.
कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या म्हटलं.
अयोध्येला जाण्याची तारीखही जाहीर केली होती. काही विरोधही झाला.
मी सगळं पाहत होतो. मुंबईतून, दिल्लीतून, यूपीतून सगळीकडून माहिती मिळत होती, काय चाललंय ते कळत होतं.
एक वेळी अशी आली, असं लक्षात आलं की हा सगळा ट्रॅप आहे, आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे.
या सगळ्याची सुरुवात ज्यापासून झाली, रसद जी पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली..
ज्यांना ज्यांना माझी अयोध्यावारी खुपली, त्यात अनेकजण
पुण्यात आल्यापासून पायाचा त्रास सुरु आहे
पायाच्या त्रासामुळे कंबरेला त्रास होतोय, त्यामुळे 1 तारखेला ऑपरेशन करणार आहे..
हिकबोनचं ऑपरेशन करणार आहे
पत्रकारांनी उगाच नको तो अवयव बाहेर काढण्याआधी म्हटलं आपणंच सांगावं, कोणत्या अवयवाचं ऑपरेशन आहे ते..
सभेला हॉल परवडत नाही.. म्हटलं एसपी कॉलेज मिळतं का बघा, तर ते म्हणाले की हल्ली आम्ही कुणालाच देत नाही..
आता आम्हाला नाही तरु कुणालाच नाही..
पण सध्याचं हवामान पाहता कोणत्याही ठिकाणी पाऊस पडेल असं दिसतंय..
आता म्हटलं निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
भाषणाआधी सभेला आलेल्या अंध विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी व्यासपिठावर बोलावलं
पुण्यात सभेआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जंगी स्वागत
श्रीरामाची मूर्ती देऊन राज ठाकरेंचा सन्मान
सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला राज ठाकरेंनी वंदन केलं
साईनाथ बाबर शहराध्यक्ष झाल्यानंतरची राज ठाकरेंची पुण्यातली पहिलीच सभा
शाखा अध्यक्ष ते शहर अध्यक्ष हे मनसेतच होऊ शकतं..
मला भाषणांची सवय कमी
दहा दहा वीस वीस केस आम्ही अंगावर घेतल्या
पुणे शहरातील लोकांना आता जागृत व्हायला हवं
मनसेला पुणेकरांनी सत्ते बसवलं पाहिजे
167 पैकी पालिकेत दोनच नगरसेवकांचा होता
राज ठाकरे सभेसाठी रवाना
थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा
धर्मवीरचे पोस्टर बॅनर कुणी लावले
धर्मवीरचं प्रमोशन कुणी केलं
दिघे साहेब म्हणतात, हिंदुत्वाची जबाबदारी राजसाहेब आता तुमच्या खांद्यावर?
शिवसैनिक पण हेच सांगताय, उद्धवजी आम्हाला तुमच्या नाही राज साहेबांमध्ये बाळासाहेब दिसतात.
उद्धव ठाकरे टोमणेसम्राट : गजानन काळे
राऊतांना दिवसांधळेपणा सुरु झाला आहे : काळे
अमोल मिटकरींवर गजानन काळेंचा टोला, अमोल मिटकरी हे थ्री इडियटचे सायलेन्सर
ओवैसीला मोकाट सोडलंय तुम्ही बोलायला? आणि आम्हाला सभेसाठी अटी लावता? गजानन काळेंचा सवाल
हिंदुत्त्वावर बोललं की तुम्ही म्हणता विकासावर बोला…
चला संदीप खरेच्या कवितेप्रमाणे कवितेवर बोलू काही…
नोकऱ्या मिळाल्यात का? रोजगार मिळाला का?
अमेरिकेने लादेनला मारलं, तुम्ही तर विश्वाचे नेते आहात असं म्हणता ना… मग जा पाकिस्तानात आणि त्याला आणा मुंबईत
दाऊद एक मच्छर आहे.
केंद्रानं त्याला पकडून आणण्यासाठी कारवाई करावी…
शरद पवारांचं मार्गदर्शन नरेंद्र मोदी घेतात
बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे महाराष्ट्रात सरकार चालतंय
शरद पवार मोठे नेते आहेत
चंद्रकांत पाटील यांना बऱ्याच गोष्टींची माहीत नाही
संजय राऊत लाईव्ह
केंद्र सरकारने तेलाच्या किंमती आवाक्यात आणल्याच पाहिजे
15 रुपये वाढवायचे आणि 9 रुपये कमी करायचे, अशी केंद्राची निती आहे
केंद्र सरकारने सगळ्यात आधी आमचा जीएसटीचा परतावा द्यावा
महाराष्ट्राच्या वाट्याची हजारो कोटी रुपयांची रक्कम द्यावी, त्यावर कुणीच काही बोलत नाही
फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जीएसटीसाठी तगादा लावला पाहिजे
गणेश कला क्रीडा मंच सभागृह मनसैनिकांनी खचाखच भरला
आता प्रतीक्षा राज ठाकरेंच्या सभागृहातील आगमनाची
थोड्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
बाईक रॅली काढत वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी
बाईक रॅली काढत वसंत मोरे यांचं शक्तिप्रदर्शन
राज ठाकरेंच्या सभेच्या पूर्वसंध्येपासून वसंत मोरे चर्चे
फेसबुक लाईव्ह करत खदखद मांडल्यानं वसंत मोरेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा रंगात
वसंत मोरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष
वसंत मोरे यांच्या खदखदीवर राज ठाकरेंची सभा ऐकायला आलेल्या मनसैनिकांना काय वाटतंय? जाणून घ्या काय म्हणाले मनसे कार्यकते
वसंत मोरे निवासस्थानावरुन मोरेबागेतील कार्यालयात पोहोचले
कार्यालयातून कार्यकर्त्यांसह टू व्हीलर रॅलीने सभा स्थळी जाणार
कार्यालयात कार्यकर्ते जमायला सुरवात
फेसबुक लाईव्हनंतर वसंत मोरे टीव्ही 9 मराठीवर एक्स्क्लुझिव्ह
वसंत मोरे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत
निलेश माझिले यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनं वसंत मोरे नाराज
वसंत मोरे शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवेनं चर्चांना उधाण
माझ्यापर्यंत होतं तोवर ठीक होतं, आता माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रकरण गेलंय..- वसंत मोरे
संयम तुटण्याची वेळ येऊ लागली आहे – वसंत मोरे
महिन्याभरापासून मनसेत हुकुमशाही सुरु – वसंत मोरे
मनसेत काही पार्ट टाईम जॉबवाले आहेत, त्यांच्याकडून माझ्या आणि माझ्या समर्थकांविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, वसंत मोरे यांचा आरोप
झारीतले शुक्राचार्य कोण? याचा वसंत मोरे यांचा सवाल
पवार बारामतीत, राज ठाकरे पुण्यात
रविवारी राजकीय घडामोडींना वेग
राज ठाकरेंच्या सभेची सगळी तयारी पूर्ण
मनसे नेते सभास्थळी जमा होण्यास सुरुवात
पाहा थेट आढावा –
मनसे नेते नितीन सरदेसाई सभास्थळी दाखल
राज ठाकरे काय बोलणार याची महाराष्ट्राला उत्सुकता – सरदेसाई
दोन तास राहिले आहेत, वाट बघू.. राज ठाकरे काय बोलतात त्याची.. – सरदेसाई
राज ठाकरेंच्या सभा स्थळाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त
मोठ्या प्रमाणात गणेश कला क्रीडा मंचाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
चार ते पाच हजार पोलिसांचा फौजफाटा
राज ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात
मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याचा अंदाज
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली सभेच्या तयारीची माहिती.. पाहा व्हिडीओ
तातडीनं निलेश माझिरेंना हटवण्यात आल्यानं वसंत मोरे यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. मी पुण्यात बांधलेल्या टीमचं खच्चीकरणं केलं जात असल्याची भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. राज साहेबांना त्रास होईल, अशी कामं मनसेच्या पार्ट टाईम कार्यकर्त्यांकडून सुरु असल्याचा टोला वसंत मोरेंनी लगावलाय.
राज ठाकरेंनी घेतली सदानंद मोरे यांची भेट
सदानंद मोरे हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक
सदानंद मोरेंसोबत राज ठाकरेंची महत्त्वपूर्ण चर्चा
मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज संत साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची भेट घेतली. संत साहित्याची परंपरा तसंच महाराष्ट्राचा इतिहास यांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते श्री. अनिल शिदोरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. pic.twitter.com/MMtdQLWrMS
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 21, 2022
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांची राज ठाकरेंनी घेतली त्यांच्या निवासस्थानी भेट
राज ठाकरेंची इतिहास अभ्यासकांसोबत चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज सायंकाळी पुणे येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये शिवकालीन इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर प्रदीर्घ चर्चा झाली.#MNSAdhikrut pic.twitter.com/kY3aGhCZhM
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 21, 2022
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे.
5 जून रोजी होणारा दौरा स्थगित का केला, याबाबत आज राज ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
राज ठाकरेंचा स्थगित झालेला अयोध्या दौरा, बृजभूषण सिंह यांचा झालेला विरोध आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडी, मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी केली धरपकड, या सर्व मुद्द्यावर राज ठाकरे चौफेर बॅटिंग करण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांची परवानगीही मिळाली आहे.
अशातच मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी टिझर पे टिझर शेअर करत या सभेची उत्सुकता वाढवण्यात आली आहे.
टोमणे सभेचा समाचार आता पुण्यात …
उद्या सकाळी १० वाजता राजगर्जना … pic.twitter.com/9VKIEbg1nf
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 21, 2022
राज ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय. राज ठाकरेंची ही सभा (Pune MNS) गेल्या तीन सभांसारखीच वादळी होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली. तर बाळासाहेब झाल्यासरखे वाटणार अनेकजण सध्या फिरत आहे. कध हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा, म्हणत राज ठाकरे यांना थेट डिवचलं होतं. त्यामुळे राज ठाकारे पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगिती केला. त्यावरही ते खुलेपणे बोलणार आहेत. या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत.
या अटी कोणत्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी वाचा दादासाहेब कारंडे यांचा खास रिपोर्ट… इथे क्लिक करा.
राज ठाकरेंची सकाळी 10 वाजता पुण्यात सभा
अयोध्या दौरा स्थगित का केला?
राज ठाकरे पुण्यात सभेत स्पष्ट करणार
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं राज ठाकरेंच्या सभेकडे लक्ष
राज ठाकरेंची सभेसाठी पुण्यात जय्यत तयारी