ठाणे: राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. भोंग्यांबाबतची माझी भूमिका आजची नाहीये. जुनीच आहे. या मुद्द्यावर मी वारंवार बोललो आहे. माझी मेमरी शार्प आहे. मी कधी काय बोललो हे मला अजूनही आठवतं. त्यामुळे अजितदादा मी तुमच्यासाठी तीन व्हिडिओ आणले आहेत. ते जरा एकदा पाहूनच घ्या, असं सांगत राज ठाकरे यांनी भरसभेत त्यांच्या भाषणाचे तीन व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओत राज ठाकरे हे भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. राज यांच्या या लाव रे तो व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आता प्रत्येक सभेत राज ठाकरे व्हिडीओ दाखवूनच विरोधकांना प्रत्युत्तर देणार असल्याचंही बोललं जात आहे.
राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा पार पडली. गुढी पाडव्याच्या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती. राज यांनी कालच्या सभेत एकएका नेत्याचे मुद्दे खोडून काढले. लाडके अजित पवार काय म्हणतात पाहा. त्यांचा आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना भोंगे आताच दिसले का? अगोदर भोंगे दिसले नाही का? तुमच्या माहितीसाठी सांगतो तीन व्हिडिओ आणले आहेत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी या सभेत तीन व्हिडीओ दाखवले. त्यातील एक व्हिडीओ सभेतील होता आणि दुसरे माध्यमांशी बोलतानाचे होते. या तिन्ही व्हिडीओत ते अजान, भोंगे आदींबाबत बोलताना दिसत आहेत. भोंगे हटवले पाहिजेत. एका धर्माचा दुसऱ्या धर्माला त्रास होता कामा नये, असंही राज या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या विधानाचाही समाचार घेतला. तसेच भुजबळ तुरुंगात का गेले याचे कारणही सांगितलं. भुजबळ साहेब तुमचे सीए, तुमच्या माणसामुळे केलेल्या कामामुळे तुम्हाला आत जावं लागलं. मोदींवरील टीकेवरून नाही जावं लागलं. दोन अडीच वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पहिला शपथविधी यांचा कसा होतो? असा सवाल त्यांनी केला. मनसे हा संपलेला पक्ष आहे म्हणतात. संपलेला पक्ष आहे तरी बोलतात. रकानेच्या रकाने भरत आहेत. लिहित आहेत. अन् वर संपलेला पक्षही म्हणत आहेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
संबंधित बातम्या:
चौकशीसाठी हजर व्हा, अन्यथा फरार घोषित करू, सोमय्यांना आर्थिक गुन्हेशाखेची नोटीस