ठाणे: वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) सांगणं दोन मागण्या पूर्ण करा. देशावर उपकार होतील. एक म्हणजे समान नागरी कायदा आणा. दुसरं म्हणजे देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा. आम्हाला असूया नाही आमच्याकडे एक. तुमच्याकडे पाच-पाच. आम्हाला त्याचा त्रास होत नाही. पण लोकसंख्या वाढीने देश फुटेल. पण या गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहे, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींचं समर्थन वेळी बोललो तेव्हा उघड बोललो. या भूमिका नाही पटल्या. मोदींनी 370 कलम रद्द केलं. तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. मोदी सारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणारा मी होतो. नंतर बाकीचे बोलले. राजीव गांधी (rajiv gandhi) नंतर बहुमत मिळालेल्या पंतप्रधानाकंडून काय व्हावं हे भाषणात बोललो असंही राज यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी ठाण्यात जोरदार सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. माझ्या गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेक पत्रकारांनी आपला कंडू शमवून घेतला. मग वाटेल ते भाजपची स्क्रिप्ट होती. राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगणारे हेच लोक. महाराष्ट्रात चागले पत्रकार, गुणी पत्रकार, पण भामट्या पत्रकारांमुळे मागे पडले. काही पत्रकार झाले काही संपादक झाले. मग आपण काही बोललो तर टीका करायची. टीका म्हणजे काय त्या राजकीय पक्षाचे म्हणणे आहे ते यांनी खरडायचं, अशी टीका राज यांनी केलं.
एके दिवसी आशूतोष गोवारीकर यांचा लगान सिनेमा आला होता. त्यानंतर स्वदेस आला होता. तो स्वदेस मी पाहिला. आशूने बोलावलं. तो चित्रपट पाहत असताना मी बाहेर पडलो. मी आशूला विचारलं, असा पिक्चर असतो का? हा काय पिक्चर आहे. मी इकडचं तिकडचं बोललो आणि घरी आलो. त्यानंतर मी खरंच चित्रपट पाहिला का असा विचार केला. स्वदेस पाहताना माझा एक चित्रपट डोक्यात घेऊन गेलो होतो. परत तो सिनेमा पाहिला. त्याला मी म्हटलं मला माफ कर. मी डोक्यात काही घेऊन गेलो होतो. ती जी परिस्थिती संपादक पत्रकारांचं होतं. त्यांनी स्वत:चं भाषण आणलं होतं. राज ठाकरे यावर बोलतील. त्यावर बोलतील असं सुरू होतं त्याचं. तीन वर्षापूर्वी मोदीवर बोलले आताही बोलतील. मी नाही बोललो. परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहे. तुमचेही वाभाडे काढायचे आहेत मला. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजप सेनेला बहुमत आल्यावरही ज्या प्रकारे मतदारांची प्रतारणा केली. महाआघाडीचं सरकार झालं. पहाटेचा शपथविधी झाला. तो फिस्कटला त्यानंतर यांचं सरकार आलं. यावर बोललो त्यात भाजपची स्क्रिप्ट कुठे आली. ही तर सर्व महाराष्ट्राला माहीत होती. ज्यावेळी मोदींवर बोलत होतो. त्यांच्या भूमिका नाही पटल्या उघड बोललो, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते तुमच्याकडे पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक एक पोहोचवला की पवार मोदींची भेट घेतात. पुढचा माणूस सांगतात. देशमुख गेले तेव्हा मोदींची भेट घेतली. अजितचं काय पुन्हा एक. नवाब मलिकांनी फाजीलपणा केला, मग मलिक आत. मग खासदारांचा फोटो घेतला. मग राऊतांबद्दल बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. त्यांच्या वाढदिवसाला मी बोललो होतो. पवार खूश झाले की भीती वाटते. आज पवार राऊतांवर खूश आहे. कधी टांगलेला दिसेल कळणार नाही,. यात अनेक काँग्रेसवाले गेले आहेत. आणि उशीरा समजते. तेव्हा ते बोलले होते ते आज लागलं. अजित पवारांकडे रेड पडते. सख्य्या बहिणीकडे रेड पडते. त्यानंतरही मोदी पवार यांचे मधूर संबंध राहतात कसं काय मी कधी पवारांना भडकलेलं पाहिलं नाही. मी उघड बोलत असताना त्यांच्या शेपट्या आत होत्या. एक जंत पाटील. बघा ते जंत पाटील या म्हणतात. हे कधी म्हणे गेले होते उत्तर प्रदेशात त्याचं कौतुक वाटतं. जंत पाटील माझं भाषण ऐका. ज्या बातम्या कानावर येतात त्या प्रमाणे उत्तर प्रदेशातविकास झाला असेल तर आनंद आहे. माझी भाषा जर तरची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंची वादळी उत्तरसभा लाईव्ह, इतर पक्षांचे “भोंगे” बंद होणार-मनसे