Nitesh Rane यांच्यावरील कारवाई ही राजकीय आकसातून - Rajan Teli

Nitesh Rane यांच्यावरील कारवाई ही राजकीय आकसातून – Rajan Teli

| Updated on: Feb 03, 2022 | 1:50 PM

सिंधुदुर्ग (Sindhudurg) भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष राजन तेली(Rajan Teli), अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची ओरोस येथील कार्यालयात भेट घेतली. आमदार नितेश राणे यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसातून आहे, असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg) भाजपा (BJP) जिल्हाध्यक्ष राजन तेली(Rajan Teli), अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची ओरोस येथील कार्यालयात भेट घेतली. आमदार नितेश राणे यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसातून आहे, असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. जिल्हा पोलीस राजकीय दबावाखाली आहेत. पोलिसांची अशीच भूमिका राहिली तर पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा धमकीवजा इशारा राजन तेली यांनी दिला आहे. दरम्यान, नितेश राणेंना सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून कणकवली पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे. न्यायालयानं नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र 4 तारखेला जेव्हा पोलीस कोठडी संपेल त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर निश्चितच राणे यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. न्यायालय त्यावर निर्णय देईल.