आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून आलेल्या सूचनांबाबत माहिती देण्यात आली आहे. जास्त रुग्णांना लक्षण नाहीत, लक्षणं असणाऱ्य रुग्णांची संख्या कमी आहे. होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिमॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत, तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन काळ हा सर्व राज्यात सात दिवसांचाच राहणार आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे.
क्वारंटाईन रुग्णांना कॉल करणार
कॉल सेंटरवरून रुग्णाला कॉल जाणार असल्याचीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॉल सेंटरवरून ही प्रक्रिया पार पडणार आहे. रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे.
ऑक्सिजन निर्मितीचे 404 प्लांट सुरू
ऑक्सिजन निर्मितीचे 404 प्लांट सुरू झाले आहेत, येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आणखी १०० प्लांट सुरू होणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. बेड व्हेंटिलेटची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ईसीआरटीटू च्या माध्यामातून केंद्र सरकारकडून काही निधी देण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. तसेच केंद्राने कलेक्टर लेवलला परवानगी देऊन खर्च करण्यात यावा अशी मागणी केल्याचेही सांगितले. आरोग्य विभागाकडून टेंडर काढली आहेत, त्यामुळे लवकरच निधीच्या खर्चाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लसीकरणात महाराष्ट्रात आणखी वेग वाढण्याची गरज आहे, असे मत केंद्राकडून नोंदवण्यात आले आहे, त्यामुळे लसीकरण आणखी वेगवान होणार आहे.