केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणात ट्विस्ट, गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे?

| Updated on: Mar 03, 2025 | 1:52 PM

Raksha Khadse Daughter Harassed: पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अनिकेत भोई हा आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणात ट्विस्ट,  गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे?
Raksha Khadse Daughter Harassed
Follow us on

Raksha Khadse Daughter Harassed: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींना रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत यात्रेत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केली. हे सर्व आरोपी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली आहे.

आरोपींची पोलिसांना धमकी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा अंगरक्षक पोलिसाला यात्रेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी या गुन्ह्यात अनिकेत भोई याला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली होती. अटक केल्यावर भोई याला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर अनिकेत भोई याने तुम्ही माझे काहीच वाकडे करू शकत नाही, या शब्दांत पोलिसांना धमकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनिकेत भोई याच्याविरुद्ध यापूर्वीही मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चार ते पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपींवर दोन गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुली सोबत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एक तर दुसरा मुलींची छेड काढल्या प्रकरणी असे एकूण दोन गुन्हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेडखानी केल्याप्रकरणी अनिकेत भोई, पियूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई, सचिन पालवे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे सुद्धा वाचा

आरोपी शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी?

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अनिकेत भोई हा आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे. पीयूष मोरे हा शिंदे गटाचा माजी नगरसेवक, सचिन पालवे शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष मुक्ताईनगर शहर प्रमुख तर किरण माळी आणि सोहम कोळी हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे.