केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडले, ‘माझा कार्यकर्ता असेल तर…’

| Updated on: Mar 02, 2025 | 6:25 PM

Raksha Khadse Audio Clip: छेड काढणारे मुले मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडले आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडले, माझा कार्यकर्ता असेल तर...
Raksha Khadse Daughter Harassed
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

Raksha Khadse Daughter Harassed: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक प्रकार त्यांच्या गावात घडला होता. मुक्ताईनगरमधील कोथडीत होणाऱ्या संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती. त्यावेळी काही टवाळखोर मुलांनी तिची छेड काढली. त्यावरुन आता महायुतीमध्येच तणाव निर्माण झाला आहे. छेड काढणारे मुले मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याच्या प्रकाराबाबत बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, जो कोणी या घटनेत आरोपी असेल, त्याला मी पाठिशी घालणार नाही. तो व्यक्ती माझा कार्यकर्ता जरी असेल तरीही मी त्याला पाठीशी घालणार नाही. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी द्या. परंतु मतदार संघात कुठलीही घटना घडली म्हणजे एकनाथ खडसे यांना त्यांच्या कुटुंबियांकडून माझ्यावर टीका केली जाते.

या पाच जणांवर गुन्हा दाखल

रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश आहे. त्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे. पियुष मोरे हा कधीकाळी भाजपमध्ये होतो. परंतु त्यानंतर त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान हे प्रकरण आपण अधिवेशात उपस्थित करणार असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिंदे सेनेची अडचण होणार आहे. रक्षा खडसे यांनी सांगितले की, सोबत पोलीस असताना हा प्रकार घडला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणात या घटनेतील संशयित आरोपी पियुष मोरे (महाजन) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा फोनवरील संवादाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मंत्री रक्षा खडसे आमदाराचे नाव घेत आहेत. या ऑडिओची ‘टीव्ही 9 मराठी’ स्पृष्टी करत नाही.