दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये फूट, महाराष्ट्रातील या पक्षाचे 15 उमेदवार जाहीर

| Updated on: Jan 11, 2025 | 7:18 PM

delhi election 2025: इंडिया आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अरविंद केजरीवाल यांना हरवा आणि भाजपला जिंकवा, असे आम्ही म्हणत आहोत. आमचा पक्ष एनडीएमध्ये आहे. आम्ही भाजपला समर्थन करत आहोत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये फूट, महाराष्ट्रातील या पक्षाचे 15 उमेदवार जाहीर
delhi election 2025
Follow us on

महाराष्ट्र, झारखंडनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात असलेल्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून प्रचार सुरु झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्रातील पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने निवडणूक लढवण्याची घोषणा करत १५ उमेदवारांच्या नावे जाहीर केली आहेत. उर्वरित जागांवर आठवले यांच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे.

रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी सांगितले की, दिल्लीचे सलग तीन वेळा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री राहिले. मात्र त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाही. ते स्वत: कारगृहात केले. त्यांनी दिल्लीचे नाव खराब करण्याचे काम केले. केजरीवाल यांनी पूर्वांचलच्या नागरिकांना बनावटी म्हटले. तेच केजरीवाल त्या लोकांच्या मतावर एवढे वर्षे सत्तेत राहिले आहेत.

भाजपला पाठिंबा देणार

दिल्लीत उमेदवार जाहीर केल्याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, भाजपला नुकसान होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही १५ जागांवर उमेदवार उभे करत आहोत. बाकी जागेवर आम्ही भाजपला समर्थन देत आहोत. दिल्लीत भाजप सत्तेवर आली पाहिजे ही आमची भावना आहे

हे सुद्धा वाचा

इंडिया आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अरविंद केजरीवाल यांना हरवा आणि भाजपला जिंकवा, असे आम्ही म्हणत आहोत. आमचा पक्ष एनडीएमध्ये आहे. आम्ही भाजपला समर्थन करत आहोत. आमचा पक्ष राष्ट्रीय असल्याने आम्ही १५ जागांवर निवडणूक लढवत आहोत. आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही भाजपला समर्थन करणार आहोत.

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, संजय राऊत खरे बोलत आहे. माहाविकास आघाडीत एकमत नाही. राज्यात माहविकास आघाडीची स्थिती गंभीर आहे. पण महायुती भक्काम आहे. मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत.