रत्नागिरी : कशेडी घाटात तब्बल 50 फुट दरीत एक बस कोसळली (Bus Collapsed In Kashedi Ghat). आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत कार्य जोरात सुरु आहे (Bus Collapsed In Kashedi Ghat).
मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील 50 फुट दरीत कोसळली. या बसमध्ये 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहेत.
या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध अजून गाडीत अडकून आहे.
जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानांची रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या 108 रुग्णवाहिका घटनास्थळी मदतीला पोहोचल्या आहेत. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
यमुना द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; गाडीमधल्या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू#YamunaExpressway #carcollisiontanker https://t.co/AyDRfGeH2i
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
Bus Collapsed In Kashedi Ghat
संबंधित बातम्या :
उरणमधील अपघातग्रस्त टँकरच्या गॅस गळतीवर अखेर नियंत्रण, अग्निशामक दलाच्या प्रयत्नांना यश