रत्नागिरी : पेट्रोल पंपावर CNG चा तुटवडा; वाहनांच्या लांबचलांब रांगा
रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे.