रत्नागिरी : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध असतांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित आज मोर्चा काढला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थ मात्र चांगलेच आक्रमक झाले असून जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे घुसण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला आहे. यावेळी अनेक नागरिकांनी पोलिसांना बाजूला करत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वातावरण मात्र चांगलेच तापले.
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तात असतांनाही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना जुगारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडून आंदोलन कर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्यानंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरिकांना अडवितांना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली.
खरंतर अनेक आंदोलकांना पोलिस अडवू न शकल्याने त्यांनी जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी साखळी पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये नागरिकांना अडविण्यात पोलिस अपयशी ठरले होते.
दरम्यान बऱ्याच वेळ ही संपूर्ण परिस्थिती तणावाची झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटविले. मात्र, नागरिकांचा विरोध अधिक वाढत असतांना सर्वेक्षण सुरू असल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळल्याची बघायला मिळाली. त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या दरम्यान सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वेक्षण सुरू असल्याने ग्रामस्थानी परवानगी शिवाय हे केलं जात असल्याने त्याला विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन हा विरोध करत आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विरोधाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर इथे आंदोलन देखील केले जाणार होते. त्यावरून मोर्चाची तयारी करण्यात आली होती. त्यापूर्वीच विनायक राऊत यांना ताब्यात घेण्यात आले.
मात्र, नागरिक त्यानंतर चिडले आणि थेट पोलिसांच्या साखळी पद्धतीने केला जाणाऱ्या विरोधाला जुगारून आंदोलकांनी सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अत्यंत तणावाची परिस्थिती बारसू येथे बघायला मिळाली आहे.