मुंबईः महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. या चौकशीवर शिवसेना खासदार संजय राऊत एक इशारा देत प्रतिक्रिया दिलीय. राऊत म्हणाले की, मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्याने बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे उखडून काढत आहेत. त्यांच्यामागे हे ईडी, सीबीआय वगैरे लावलं जातंय. मलिकांची चौकशी होईल. आम्ही वाट पाहतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला, घरी येऊन घेऊन जातात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
नेमके प्रकरण काय?
माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार, अशी ट्वीट करून वारंवार माहिती देणारे आणि गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे महाविकास आघाडीतील अल्यसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची अखेर ईडीने चौकशी सुरू केल्याचे समजते. मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे.
25 वर्षांपूर्वीचे प्रकरण
संजय राऊत म्हणाले की, हे 20-25 वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. पण किरीट सोमय्यानं काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत. भ्रष्ट्राचाराविरोधात लढणारे महात्मा. या महात्म्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधातही काही प्रकरणं दिलेली आहेत. मात्र, त्या प्रकरणी इतरांना समन्स का नाही आले. समन्स फक्त लालू यादवांचा पक्ष, मविआ आघाडीलाच काय तेतो, असा सवाल त्यांनी केला.
त्यानंतर ते आणि आम्ही…
संजय राऊत पुढे म्हणाले की, 2024 पर्यंत हे सगळं चालेल. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत. प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं. चर्चा झाली 2023 नंतर काय होईल, याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी. नवाब मलिक खरं बोलतात. ते किती खरं बोलतात, ते ज्या प्रकारे एका कॅबिनेट मंत्र्यांला नेण्यात आलं. हे आम्हाला चॅलेंज करणारं आहे. त्यामुळे 2024 नंतर तुमचीही चौकशी होईल, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात