उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचं बंड; सोमवारी अपक्ष अर्ज भरणार

| Updated on: Oct 26, 2024 | 5:11 PM

विधानसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाल्याचं पाहयला मिळत आहे, बडा नेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचं बंड; सोमवारी अपक्ष अर्ज भरणार
Follow us on

विधानसभा निवडणुकीचंं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 20 नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून अनेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा करताच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाल्याचं समोर आलं आहे.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हरून खान यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर नाराज झाले आहेत. ते ठाकरे गटाकडून वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आता राजू पेडणेकर हे सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू पेडणेकर तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, ते यावेळी वर्सोवातून पक्षाकडून निवडणूक  लढण्यास इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे मुंबईमध्ये भाजप विधानसभेच्या 18 जागा लढवणार आहे. यापैकी विधानसभेच्या 14 मतदारसंघात भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर अद्याप चार जागांवर उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे.

मुंबईतील कोणत्या जागा भाजप लढवणार? 

बोरीवली
दहिसर
कांदिवली पूर्व
चारकोप
गोरेगाव
वर्सोवा
अंधेरी पश्चिम
मुलुंड
घाटकोपर पश्चिम
घाटकोपर पूर्व
विलेपार्ले
वांद्रे पश्चिम
सायन-कोळीवाडा
वडाळा
मलबार हिल
कुलाबा
कलिना
मालाड पश्चिम