कोल्हापूर आणि सांगलीला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

| Updated on: Jul 25, 2024 | 9:21 PM

राज्यात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊल सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. २६ जुलै रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Follow us on

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सांगली-साताऱ्यात रेड अलर्ट

सांगलमध्ये ही मुसळधार पाऊस होत आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिराळा,पळूस, वाळवा आणि मिरज तालुक्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नदी काठावर जाण्यास बंदी

सातारा जिल्ह्यातल्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. वारणा, कृष्णा नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सुट्टी घोषित केली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर नागरिकांसाठी बंदी आदेश देखील देण्यात आले आहे. पूर परिस्थितीत स्टंटबाजी, सेल्फी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगलीच्या कृष्णेची पातळी आता 34 फुटावर गेली आहे. उद्या सकाळ परत आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. कारण कोयनेतून होणारा विसर्ग आणि सतत पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर आणि कर्नाळ रोडवर पुराचे पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिक स्थलांतर होऊ लागले आहेत.