मुंबई : राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देश तिसऱ्या लाटेच्या छायेत असल्याने लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने मुभा दिलेली आहे. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार येत्या तीन जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी आजपासून (1 जानेवारी) 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन तसेच ऑनलाईन पद्धतीने मुलांच्या नावाची नोंदणी करता येते.
संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिलेले आहेत. तसेच कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात आजपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठी नावनोंदवणी सुरु झाली आहे. https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते. कोवीन या वेबसाईटवर गेल्यानंतर अॅड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंद केली जाऊ शकते.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच गर्दी करणाऱ्या आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचनादेखील सरकारने दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णदेखील वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 454 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 157 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.
इतर बातम्या :