Maharera Project | महारेराची धडक कारवाई, महाराष्ट्रातील हजारो प्रकल्पांची नोंदणी रद्द, मुंबई, पुण्यात…

| Updated on: Jun 13, 2024 | 2:54 PM

maharera news: पुणे, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील ज्या प्रकल्पांची माहिती महारेराला मिळून आली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. प्रकल्पांची नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व माहिती वेबसाईवर अपलोड करणे गरजेची असते. परंतु ती माहिती अपलोड केली नाही.

Maharera Project | महारेराची धडक कारवाई, महाराष्ट्रातील हजारो प्रकल्पांची नोंदणी रद्द, मुंबई, पुण्यात...
maharera
Follow us on

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने पुणे, मुंबईसह राज्यातील बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे. महारेराने केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. महारेराने 1,137 प्रकल्पाची नोंदणी रद्द केली आहे. तसेच 1,750 योजनांचे काम थांबवले आहे. त्यात सर्वाधिक प्रकल्प मुंबई महानगरातील 761 प्रकल्प आहेत. तसेच पुण्यातील 628 प्रकल्प आहे. उत्तर महाराष्ट्रातील 135, विदर्भातील 110, मराठवाडातील 100, दादरा नगर हवेलीमधील 13 आणि दमनमधील 3 प्रकल्प आहेत. ज्या विकासकांनी नियमांचे पालन केले नाही त्यांच्यावर महारेराने कारवाई केली आहे.

त्या विकसकांना जाहिराती करण्यास बंदी

महारेराने घर विकत घेणाऱ्यांसाठी खबदारीची सूचनाही केली आहे. ज्या प्रकल्पांनी महारेरामध्ये नोंदणी केली आहे, त्याच प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला महारेराने दिला आहे. तसेच विकसकांना महारेरामध्ये नोंदणी करताना प्रकल्प पूर्ण कधी होणार? त्याची माहिती देऊन त्या तारखेनुसार प्रकल्प पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या प्रकल्प पूर्ण झाले आहेत, त्याच प्रकल्पांना महारेराकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळणार आहे. अपूर्ण प्रकल्पांसाठी बिल्डरांना आपल्या प्रकल्पांची नोंदणी करावी लागणार नाही, तसेच त्याचे पुर्ननोंदणी होणार नाही. तसेच बिल्डरांनी महारेराच्या निर्देशानुसार कोणतेही पाऊल उचलले नाही तर त्यांची बँक खाती गोठवली जाणार आहेत. त्यांना फ्लॅट विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या जाहिराती करण्यास बंदी करण्यात येणार आहे.

महारेराने 6638 प्रोजेक्ट्स दिली नोटीस

महारेराने 6638 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यात 3751 प्रोजेक्ट्सकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित 2,887 योजनांमध्ये 1,750 योजनांची नोंदणी थांबवण्यात आली आहे तर 1,137 प्रकल्पांची नोंदणी रद्द केली आहे. त्यात मुंबई शहरातील 48 मुंबई उपनगरांमधील 115 तर पालघरमधील 216 आणि ठाणे विभागातील 182 प्रकल्प आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे महारेराचा नियम

पुणे, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील ज्या प्रकल्पांची माहिती महारेराला मिळून आली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. प्रकल्पांची नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व माहिती वेबसाईवर अपलोड करणे गरजेची असते. परंतु ती माहिती अपलोड केली नाही.