ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. राज्य सरकारला (maharashtra) भोंगे उतरविण्याबाबतची डेडलाईन देतानाच भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिास लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे यांनी भोंगे का उतरवले पाहिजे याची कारणेही सांगितली. दुसरं म्हणजे म्हणजे हनुमान चालिसा का लावणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं. या शिवाय माझ्या भात्यातील बाण अजून काढलेला नाही. तो काढायला लावू नका, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही घणाघाती टीका केली. ठाण्यात काल राज ठाकरे यांची उत्तर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
धर्म प्रत्येकानं आपआपला बाजूला ठेवावा. अजित पवारांना ऐकू नाही आलं. मी याच्या आधीही बोललो, पण ऐकू नाही आलं. लॉकडाऊन काळात कान साफ झाला असणार. पाडव्याचा भोंगा ऐकू आला. बरं मी चुकीचं काय बोललो? या मशिदींवरच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक विषय कुठेय..? तुम्हाला जो काय नमाज पठायचाय, अजान द्यायची, घरात द्या? फुटपाथ, रस्ते कशाला अडवता? प्रार्थन तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? आणि सांगूनही जर हे समजत नसेल, तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असा इशाराही राज ठाकरे यांनी यांनी दिला.
वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक विषय मुळातच नाही, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकं, विद्यार्थ्यांना, महिलांना यांचा त्रास होता. पाच पाचवेळा बांग देता, नमाज पडता. एक तर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही हे ऐकायचं? रस्त्यावर घाण झाली तर आपण ती साफ करतो, फुटपाथवर घाण झाली, तर ती साफ करतो. आणि जर कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजे. राज्य सरकारला थेट सांगतो, यातून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. ज्या देशात भोंग्याला बंदी आहे, तिथे ऐकता ना तुम्ही. निमूटपणे ऐकता ना तुम्ही. अनेक मुस्लिम बांधव परिचयाचे लोक येऊन सांगतात मला, की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी आपला भोंग्यांना विरोध का आहे हे सांगण्यासाठी त्यांनी कोर्टाची एक टिप्पणी वाचून दाखवली. 18 जुलै 2005ची ही कोर्टाची टिप्पणी आहे. त्यात कोर्टाने महत्त्वाच्या बाबींवर लक्ष दिलं आहे. कोणताही धर्म इतरांची शांतता बिघडवून प्रार्थना करा असं सांगत नाही. वृद्धांची, विद्यार्थ्यांची झोपमोड करणं, त्यांना त्रास देणं, अशा कोणत्याही गोष्टींना परवानगी देता कामा नये, असं कोर्टानेच सांगितलंय, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. जर हे कोर्ट सांगत असेल तर त्याचं पालन का होत नाही? हे मतांसाठी काहीही चालवणार.. आम्ही हे काय फक्त बघत बसायचं आणि हा देशभर त्रास आहे. तमाम हिंदूना माझं सांगणं आहे.. जिथे जिथे बांग आणि भोंगे लागत असतील तिथंतिथं हनुमान चालीसा लागलंच पाहिजे.. आम्हाला काय त्रास होतो, हा त्यांनाही होऊ दे… एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या: