पुणे शहरातील पब संस्कृतीची चर्चा सुरु असताना विदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशातील एका रिसॉर्टवर पोलिसांनी कारवाई केली. रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री अश्लील नृत्य करताना नागपुरच्या महिलांना पकडले आहे. मध्यप्रदेशच्या मूलताई पोलिसांनी वाटरपार्कमध्ये कारवाई करत 34 पुरुष आणि 11 महिलांना अटक केली आहे. अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलातील नेचर प्राईड आणि वॉटर पार्कवर ही कारवाई झाली. पोलिसांनी अटक केल्या आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील दोन जण आहेत.
मुलताई पोलीस अधीक्षक निश्चल झारिया यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु आहे. त्यानंतर रिसॉर्टमध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरु होता. या ठिकाणी रेव पार्टी करत अश्लिल नृत्य तरुण, तरुणी करत होते. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी नशेत असणारे युवत-युवती वॉटर पार्कमध्ये होते. अटक करण्यात आलेले बहुताश लोक महाराष्ट्रातील वरुड, नागपूर आणि अमरावती भागातील आहे.
निश्चल एन झरिया यांनी सांगितले की, रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यासाठी रिसॉर्टमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. 45 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रिसॉर्टमध्ये 11 मुली देखील होत्या. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे रिसॉर्ट महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. पोलिसांनी छापा टाकलेला रिसॉर्ट जंगलात बनवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीच्या नावाने हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये अनैतिक कारवाया होत असल्याची चर्चा यापूर्वी होत होती.
अमरावतीमधील वरुड येथील एका व्यक्तीच्या मालकीचे हे रिसॉर्ट असल्याचे सांगितले जात आहे. या रिसॉर्टमध्ये काही लोकांसाठी छोटी फार्म हाऊस बांधली आहेत, जी भाड्याने चालवली जातात. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हे रिसॉर्ट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने वीकेंडला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक येतात.
रेव्ह पार्टीज अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात येतात. या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू, म्युझिक, नाचगाणं आणि काही वेळा सेक्सचं कॅाकटेल असते. या पार्टीत नवख्यांना प्रवेश दिला जात नाही.