मुंबई: महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्यावतीनं हा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतोय. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्र आज आणि उद्या क्काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान विभाग्याच्या संकेतस्थळाला भेट ध्या . https://t.co/JYmdPo98tJ pic.twitter.com/KsedXFmeBP
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 18, 2021
आयएमडीच्या वतीनं आज आणि उद्या महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिली आहे. तर, आजच्य दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
येत्या २४ तासात महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंन्द्र, मुंबई संकेत स्थळाला भेट ध्या
As per IMD forecast today, there is possibility of heavy rains in Maharashtra, especially over N Konkan, N Madhy Mah & parts of Vidarbha too pic.twitter.com/pjPzhuvQW1— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2021
उद्या महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरातील बोरवली, कांदिवली, मालाड गोरेगाव, तसेच अंधेरी भागांमध्ये थांबून थांबून पाऊस होत होता. तर, आज पुन्हा दुपार नंतर पावसाला सुरुवात झाली. काही भागात हलक्या स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस झाला. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होतं मात्र दुपार नंतर पावसाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. पाऊस आल्याने पिकांना जीवनदान मिळणार आहे.
इतर बातम्या:
Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा नवा अंदाज
RMD Mumbai Predicts heavy rainfall over in Maharashtra during two days check details here