Rohit Pawar : 'भाजपाच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच सतीश उकेंवर कारवाई'

Rohit Pawar : ‘भाजपाच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच सतीश उकेंवर कारवाई’

| Updated on: Apr 01, 2022 | 5:31 PM

अहमदनगरला (Ahmednagar) जामखेड (Jamkhed) येथे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे. तर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे.

अहमदनगरला (Ahmednagar) जामखेड (Jamkhed) येथे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे. तर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण अधिकाऱ्याला कारवाईची धमकी दिल्याप्रकरणी तर सुजय विखे यांनी महाविकास आघाडी वर केलेल्या टीकेचा समाचार रोहित पवार यांनी घेतलाय. तर वकील सतीश उके हे सातत्याने भाजपाच्या विरोधात बोलतात. तर त्यांच्याकडे बीजेपी विरोधात पुष्कळ माहिती आहे, ते घेण्यासाठी कारवाई असावी, असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच केंद्रीय यंत्रणेचा वापर लोकशाहीला दडपण्यासाठी केला जात असेल तर ते चुकीचे आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे. तसेच ज्या कारवाया होत आहेत, त्यामुळे ईडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावे लागेल, अशी उपरोधिक टीका रोहित पवारांनी केली आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करू ये, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.