मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आणि विरोधकांच्या गदारोळामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. याच पार्श्वभूमीवर काही मांडलेल्या आणि मांडता न आलेल्या नियोजीत प्रश्नांसाठी समाजमाध्यमच सभागृह करण्याची संकल्पना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरु केली आहे.
रोहित पवारांचा नवा उपक्रम
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाच्या महामारीमुळे कामकाजावर वेळेची मर्यादा आली. याशिवाय विरोधकांनी सभागृहात केलेला गदारोळ यामुळे राज्यातील अनेक आमदारांना प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र या अधिवेशनात नियोजीत प्रश्नांना मांडण्याची संधी मिळाली नाही म्हणून विषय सोडून न देता, या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे ध्येय रोहित पवार यांनी ठरवले आहे.
रोहित पवार यांचे ट्विट
रोहित पवार यांनी विधिमंडळातील आपल्या प्रश्नांना फेसबुक, ट्विटरचे माध्यम दिले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. “विधिमंडळात अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला. काही प्रश्नांना लेखी उत्तरं मिळाली, मात्र वेळेअभावी सर्वच प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, परंतु जनहिताच्या दृष्टीने या प्रश्नांचा पाठपुरावा मी करत राहील. तुमच्या माहितीसाठी हे मुद्दे इथं शेअर करत आहे”, असं रोहित पवार ट्विटरवर म्हणाले.
विधिमंडळात अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला. काही प्रश्नांना लेखी उत्तरं मिळाली, मात्र वेळेअभावी सर्वच प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही, परंतु जनहिताच्या दृष्टीने या प्रश्नांचा पाठपुरावा मी करत राहील. तुमच्या माहितीसाठी हे मुद्दे इथं शेअर करत आहे. pic.twitter.com/EQXqBXHdXP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 2, 2021
वाढत्या जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतची समस्या! pic.twitter.com/E7QB9lXF8F
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 2, 2021
वाढत्या प्रदूषणासंदर्भात विधिमंडळात उपस्थित केलेले मुद्दे! pic.twitter.com/igHtO0zgON
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 3, 2021
आतापर्यंत रोहित पवार यांनी ई-कचरा गंभीर समस्या, जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या, प्रदूषण, फुलशेती धोरणाची गरज आणि शहरी बेरोजगारी या प्रश्नांवर आपल्या समाजमाध्यमांद्वारे भाष्य केले आहे. प्रत्येक विषयाचे महत्त्व नागिरकांना आणि परिणामी यंत्रणांना कळावे, यासाठी त्या विषयाची पार्श्वभूमी आणि उपस्थित करण्यात आलेले मुद्दे पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार विस्तृतपणे सांगत आहेत.
हेही वाचा : कर्जत पंचायत समिती सभापती निवडीत रोहित पवारांचं वर्चस्व, राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव बिनविरोध