“संघाचं सेवेचं काम दयाभावनेतून चालत नाही”; मोहन भागवत यांचं प्रतिपादन

| Updated on: Mar 30, 2025 | 12:46 PM

समाजासाठी स्वयंसेवकांकडून दीड लाखांहून अधिक कामं केली जातात. हीच प्रेरणा स्वयंसेवकांना दु:ख सहन करण्यास प्रेरित करते. त्यांना त्या बदल्यात काहीही नको आहे. सेवा हेच जीवनाचं ध्येय आहे. सेवाकार्ये करुणेपोटी केली जात नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

संघाचं सेवेचं काम दयाभावनेतून चालत नाही; मोहन भागवत यांचं प्रतिपादन
Mohan Bhagwat
Image Credit source: Instagram
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’ची पायाभरणी केली. नागपूरमधील माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचा विस्तार करून बांधण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवतदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, “एखाद्याच्या क्षमतेनुसार समाजात योगदान देणं महत्त्वाचं आहे. सेवाकार्य हे दयाभावनेनं नाही तर प्रेमाने केलं पाहिजे. स्वयंसेवत स्वत:साठी नाही तर इतरांसाठी काम करतात.”

“शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा आहे. आपल्या समाजात दृष्टीहिनांना उपचार मिळावेत. नेत्रहिनांची समस्या राहावी हे समाजाला शोभत नाही. हा समाज माझा आहे. त्यामुळे समाजाच्या सामर्थ्यसाठी जे काही करायचंय ते करत राहीन. प्रामाणिकपणे, तनमनधनाने आणि श्रद्धेने हे काम करत राहीन. संघाचे कार्यकर्ते अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत, ते याच प्रेरणेने. आज सर्वच क्षेत्रात सेवा सुरू आहे. छोट्या-मोठ्या प्रकल्प आणि उपक्रमात दीड लाखांहून अधिक समाजासाठी काम सुरू आहे. याच प्रेरणेतून हे काम सुरू आहे. हीच प्रेरणा आहे. स्वयंसेवक स्वत:साठी काहीच हाव ठेवत नाही. सर्वांसाठी काम करत आहेत. बदल्यात त्यांना काहीच हवं नसतं. ते काम करत आहेत. समाजानेही स्वयंसेवकांच्या कामाची कदर केली. त्यामुळेच संघ स्वयंसेवक पुढे जात आहे,” असं मोहन भागवत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“दया भावनेने हे सेवेचे काम चालत नाही. समाजाप्रती प्रेम आहे. वास्तावात समाजातील सर्वांना दृष्टी द्यायची आहे. वास्तावात समाजातील सर्वांना दृष्टी द्यायची आहे. सदासर्वदा जीवनात जी दृष्टी आवश्यक आहे. जीवनात परिस्थितीनुसार जे काही मिळालं आहे, त्या परिस्थितीचा चांगला उपयोग करून आपल्या जीवनाला सार्थक बनवणं आणि निरायम बनवण्यासाठी जीवनाची जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी आहे. त्याचं वर्णन म्हणजे सेवा. हेच जीवनाचं सूत्र आहे. एक तास संघाच्या शाखेत स्वयंविकास आणि २३ तास समाजाची सेवा, याचदृष्टीने हे काम सुरू असतं. असंच काम सुरू राहील. काम करणाऱ्यांचा भावही हाच राहणार आहे,” असं ते पुढे म्हणाले.