khadse vs chakankar: चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया, रोहिणी खडसेंचं उत्तर

| Updated on: Sep 20, 2024 | 10:08 PM

रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरुच आहे. रुपाली चाकणकरांनी केलेल्या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झाल्याचा पलटवार रोहिणी खडसेंकडून करण्यात आला आहे.

khadse vs chakankar: चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया, रोहिणी खडसेंचं उत्तर
Follow us on

शरद पवार आणि अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमधला आरोप-प्रत्यारोपाचा सामना अजूनही सुरुच आहे. मुक्ताईनगरच्या दौऱ्यात रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंचा बाप काढत त्यांच्यावर शरसंधान साधलं होतं. दरम्यान चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झाल्याचं म्हणत रोहिणी खडसेंनी देखील जोरदार पलटवार केला आहे. वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना किंमत देत नाही. असं चाकणकर म्हणाल्या. त्यावर रुपाली चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया झालाय असं उत्तर रोहिणी खडसे यांनी दिले आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते महायुतीत सहभागी झालेत. यानंतर रुपाली चाकणर देखील दादा गटात गेल्या. दरम्यान यावरुन देखील रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र डागलं होतं.

ज्यांनी एवढी मोठी पदं दिलीत. त्यांना सोडून ते दुसऱ्याकडे गेलेत असा आरोप खडसे यांनी केल तर आम्ही पक्ष बदलून दुसरीकडे गेलो नाही. आमचं चिन्ह घड्याळ आहे. असं उत्तर चाकणकर यांनी दिलंय. राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्या आहेत.

2019 मुक्ताईनगर विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील आणि तेव्हा भाजपमध्ये असलेल्या रोहिणी खडसे आमने-सामने होते. दरम्यान या निवडणुकीत अपक्ष असलेल्या चंद्रकांत पाटलांचा 1957 मतांनी विजय झाला होता. तर भाजपकडून मैदानात असलेल्या रोहिणी खडसेंना पराभवास सामोरे जावं लागलं होतं

मुक्ताईनगरमधील सद्यस्थिती राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकलेले चंद्रकांत पाटील सुरुवातील मविआसोबत होते. शिंदेंच्या बंडानंतर काही काळ तटस्थ भूमिका घेतली मात्र, महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेंना पाठिंबा दिला. यावर्षी मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील शिंदेंचे उमेदवार असू शकतात. तर भाजपमधून पराभूत झालेल्या रोहिणी खडसे यानंतर राष्ट्रवादीत गेल्या. अजितदादांच्या बंडानंतर रोहिणी खडसे
शरद पवार गटातच राहिल्या. दरम्यान यंदा रोहिणी खडसेंना मुक्ताईनगर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

रुपाली चाकणर आणि रोहिणी खडसे यांच्यातला राजकीय सामना सुरुच आहे. दरम्यान रुपाली चाकणकरांनी केलेल्या टीकेवर रोहिणी खडसेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.