Bandatatya Karadkar यांचं वक्तव्य राज्यभरातील महिलांच्या सन्मानाला धक्का – Rupali Chakankar
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांचं ते विधान संतापजनक आहे, कराडकर यांच्या विधानानं महिला(Womens)वर्गाला धक्का बसला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांचं ते विधान संतापजनक आहे, कराडकर यांच्या विधानानं महिला(Womens)वर्गाला धक्का बसला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, की वारकरी संप्रदायानं एखादं मत मांडताना असं वक्तव्य करणं योग्य नाही, बंडातात्याच नाही तर अन्य कोणी असो, असं महिलांबद्दल बोलणं चालूच ठेवलं तर कडक कारवाई केली जाईल. वैयक्तिक आरोप करणं योग्य नाही, कराडकर यांच्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगानं घेतली आहे. कपाळावर टिळा लाऊन असं वक्तव्य मुलींबद्दल करतात ते योग्य नाही. बंडातात्या कराडकर यांनी त्यांची बाजू दोन दिवसांत आयोगासमोर मांडावा, आयोग अहवालावर पुढील निर्णय घेईल, असंही त्या म्हणाल्या.
Latest Videos