मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण…; खासदार संभाजी छत्रपती काय म्हणाले? वाचा!

| Updated on: May 31, 2021 | 12:30 PM

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी राज्यसभा सदस्य संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली होती. (Sambhaji Chhatrapati reaction on meeting with narendra modi over maratha reservation issue)

मोदींवर नाराजीचा प्रश्नच नाही, पण...; खासदार संभाजी छत्रपती काय म्हणाले? वाचा!
शिवराज्याभिषेक सोहळा 2021
Follow us on

सिंधुदुर्ग: मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी राज्यसभा सदस्य संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजी छत्रपती मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आपण मोदींवर नाराज नाही, असं सांगत संभाजी छत्रपती यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Sambhaji Chhatrapati reaction on meeting with narendra modi over maratha reservation issue)

संभाजी छत्रपती आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जात असताना त्यांनी टीव्ही 9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही. नाराजीचा प्रश्नच येत नाही. आमच्या भावना त्यांना सांगणं काही चुकीचं नाही. मला त्यांना वैयक्तिक भेटायचं नव्हतं, तर समाज म्हणून त्यांना भेटायचं होतं. समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे होते, असं सांगतानाच मोदींनी मला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून नेहमीच सन्मान दिला, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. मला मोदींना वैयक्तिक भेटायचं नाही. सर्व खासदारांनी मिळून त्यांना भेटावं अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

राज्य सरकारला अल्टिमेटम नाही

7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला होता. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता, मी सरकारला कोणताही अल्टिमेटम दिला नाही. शिवराज्यभिषेक सोहळा असतो. त्यामुळे त्या दिनाचं औचित्य साधून सरकारने मराठा समाजाच्या या पाच मागण्यांवर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

अजित पवार सकारात्मक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक आहेत. त्यांनी माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच दिवशी तसं जाहीर ही केलं आहे. अजून आठ-नऊ दिवस आहेत, असं ते म्हणाले होते. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. (Sambhaji Chhatrapati reaction on meeting with narendra modi over maratha reservation issue)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्याने भाजप आक्रमक, राज्य सरकारविरोधात नागपुरात आंदोलन

‘आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच, ते दुतोंडी चेहऱ्याने वावरतायत’

पदोन्नतीमध्ये पुन्हा आरक्षण लागू केल्यास रस्त्यावर उतरु; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

(Sambhaji Chhatrapati reaction on meeting with narendra modi over maratha reservation issue)