शिवसेना चालते मग आम्ही का नाही? इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडीला खडा सवाल; आगामी निवडणुकीत एमआयएम मविआमधून लढणार?

| Updated on: Sep 11, 2024 | 5:27 PM

MIM Mahavikas Aaghadi : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. लोकसभेत महायुतीला आस्मान दाखवल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच एमआयएमच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत अशी अपडेट समोर येत आहे.

शिवसेना चालते मग आम्ही का नाही? इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडीला खडा सवाल; आगामी निवडणुकीत एमआयएम मविआमधून लढणार?
महाविकास आघाडीला खडा सवाल; आगामी निवडणूक एकत्रित लढणार?
Follow us on

विधानसभा निवडणुकांची लगबग राज्यात दिसू लागली आहे. अजून निवडणुकीसाठी अवधी असला तरी महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पण होऊ घातला आहे. तर लोकसभेला महायुतीला झटका दिल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावला आहे. आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम महाविकास आघाडीच्या मांडीला मांडी लावण्यासाठी तयार आहे. याविषयी पक्षाची भूमिका समोर आली आहे.

मग आम्हाला दूर का लोटता?

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी विधानसभेसंदर्भात पक्षाचे धोरण समोर ठेवले आहे. अंबादास दानवे एका वेगळ्या लेवलाचे नेते आहे. ठाकरेंनी सांगावं आम्हाला सोबत घेणार नाही. शिवसेना सोबत जाता. मग एमआयएमला दूर का लोटता ? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीला केला. महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी आमच्या प्रस्तावावर विचार करावं आणि निर्णय घ्यावा. त्यासाठी मविआला वेळ दिल्याचे जलील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

तर मग आम्ही ताकद दाखवू

जागा किती लढवायच्या हे आघाडीच्या गणितावर ठरणविण्यात येणार आहे. आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्यांच्यासोबत गेलो तर ठीक, नाही तर ठराविक जागा लढवणार आहोत. सगळ्या पक्षाच्या लढाईत आमची शक्यता अधिक आहे. आम्हाला राज्यात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे, असा दावा जलील यांनी केला.

राष्ट्रवादी हैदराबादच्या एका मुस्लिम पक्षाला इथे आणणार आहे. तुम्हाला आमची ताकद बघायची असेल तर बघा. आम्ही लाचार नाही. तुम्ही नाही म्हणाले तर आम्ही घरी बसणार नाही. एक वेळा तुम्ही स्पष्ट केलं तर आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा पण त्यांनी दिला.

भाजपचा पराभव करायचा

ओवेसी यांनी 5 उमेदवार घोषीत केले आहेत. फॉर्म वाटप आम्ही करत आहोत. इच्छुक उमेदवार यांनी फॉर्म भरून पाठवावे. ते फॉर्म ओवसी यांच्याकडे जातील. त्यानंतर यावर ओवेसी निर्णय घेतील. भाजपचा पराभव करायचं आहे. त्यासाठी कुणाचं कारण नको आहे. याबाबत आम्ही प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त केली. याबाबत तुम्ही भूमिका स्पष्ट करा, असे ते म्हणाले.

काही नेते आमच्या संपर्कात

वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे, ते स्वतंत्र आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. अनेक मोठ्या पक्षाचे मोठे नेते एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत आहेत. यामुळे काय काय होतं बघा. अनेक नेते आमच्याकडेही येणार आहेत. आमच्याकडे कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. राज्यातले लोक दोन्ही युती -आघाडीला त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक विचार करू असे सांगायला ते विसरले नाहीत.