Loksabha election : छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून ते 25 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून आता चंद्रकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे गटाकडून खैरे मैदानात आहेत. चंद्रकांत खैरे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे आताही शिवसेनेच्याच दोन नेत्यांमध्ये येथे लढत होणार आहे.
संदिपान भुमरे यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. खैरेंच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. आता दोन शिवसैनिकांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा होती.
संदिपान भुमरे यांच्यापुढे वंचित वंचित बहुजन आघाडीचं ही आव्हान असणार आहे. वंचितमुळे महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथे चौरंगी लढत झाली होती. ज्यामध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली होती. मागच्या निवडणुकीत खैरे दुसऱ्या क्रमांकावर होते. औरंगाबादमधील खैरे त्याआधी चार टर्म खासदार राहिले आहेत. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व राहिले आहे.
इम्तियाज जलील
पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी
मतंः 388373
चंद्रकांत खैरे
पक्षः शिवसेना
मतंः 383186
हर्षवर्धन जाधव
पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष
मतंः 282547
सुभाष झांबड
पक्षः कॉंग्रेस
मतंः 91401
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांचा पराभव केला. त्यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव केला होता.