अशक्तपणा वाढला, चक्कर, उलट्या, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

| Updated on: Nov 03, 2023 | 4:46 PM

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अशक्तपणा वाढला आहे. त्यांना चक्क येत आहेत. तसेच उलट्यादेखील झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर मनोज जरांगे यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टर सर्व प्रकारची काळजी घेत आहेत. जरांगे लवकर बरे व्हावेत, यासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात आहे.

अशक्तपणा वाढला, चक्कर, उलट्या, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
Manoj Jarange Patil
Image Credit source: Tv9
Follow us on

दत्ता कानवटे, Tv9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 3 नोव्हेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याची बातमी आज सकाळीच समोर आलेली. त्यांच्या तब्येतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. याउलट त्यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती समोर आलीय. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना मराठा समाजाकडून केली जात आहे. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मनोज जरांगे लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा आहे. उपोषणामुळे सलग 9 दिवस अन्न-पाण्याशिवाय राहिल्यामुळे जरांगे यांची तब्येत खालावली आहे. ते लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर ते रात्री रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांचा अशक्तपणा वाढला आहे. त्यांना रुग्णालयात उलट्या देखील झाल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जरांगे यांना उलट्या झाल्यानंतर डॉक्टर सतर्क झाले आहेत. डॉक्टरांकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहेत. डॉक्टर जरांगे यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार घेत आहेत.

उलट्या आणि चक्कर आले

मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत. या रिपोर्ट्समध्ये मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात उलट्या झाल्या आहेत. त्यांना प्रचंड चक्कर आले आहेत. तसेत त्यांचा अशक्तपणा वाढला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्यांच्यावर सध्या उपचार युद्ध पातळीवर सुरु आहेत. पण त्यांना अचानक उलट्या झाल्यामुळे आणि चक्कर आल्यामुळे चिंता वाढल्याची परिस्थिती आहे.

जरांगेंनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काल उपोषण सोडलं. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी आलं होतं. या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंना सर्व कायदेशीर बाजू समजावून सांगितली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हातून ज्यूस पिवून जरांगे यांनी काल संध्याकाळी उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आलीय.