Maratha Reservation | आणखी 3500 नोंदी सापडल्या, त्यामुळे किती लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार?

| Updated on: Nov 03, 2023 | 8:51 AM

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारकडून शिंदे समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून मराठा समाजाचे कुणबी पुरावे शोधण्याच काम सुरु आहे. या समितीला महाराष्ट्राच्या काही भागात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद असल्याचे पुरावे आढळले आहेत. त्यामुळे काही लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते.

Maratha Reservation | आणखी 3500 नोंदी सापडल्या, त्यामुळे किती लाख मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार?
maratha reservation
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजी नगर (दत्ता कानवटे) : महाराष्ट्रात आणि देशात सध्या मराठा आरक्षणाची चर्चा आहे. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. कालच या आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याचवेळी सरकारने 2 जानेवारीपर्यंत मुदत दिल्याच म्हटलं आहे. मराठा समाज कुणबी आहे की नाही? याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने समिती बनवली आहे. न्यामूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सध्या मराठा समाजच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. शिंदे समितीच्या शोध मोहिमेत मराठवाड्यात आणखी 3500 नोंदी सापडल्याची माहिती आहे. मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी 15 हजारावर पोहोचल्या आहेत.

25 हजारापर्यंत नोंदी सापडण्याचा शिंदे समितीला अंदाज आहे. 25 हजार नोंदीतून 25 लाख मराठा समाजाला प्रमाणपत्र देणे शक्य आहे. शिंदे समितीतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलीय. शिंदे समितीची कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राद्वारे आरक्षण द्यावं, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. अर्धवट नको, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाला सरकारी योजनाचा बऱ्यापैकी लाभ मिळेल. सरकारने नेमलेल्या समितीकडून याच कुणबी नोंदी शोधण्याच काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

धाराशिव जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या?

छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच धाराशिव जिल्ह्यातही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. अशा 459 नोंदी आढळल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तब्बल 40 लाख 49 हजार कागदपत्रे, दस्तावेज आणि नोंदी यांची तपासणी केली. यात त्यांना महत्वाचे पुरावे सापडले आहेत. यातील 407 नोंदी या 1948 च्या आधीच्या आहेत. 1948 ते 1967 या काळात केवळ 52 नोंदी सापडल्या आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला आहे. ही समिती येत्या 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारसमोर अहवाल सादर करणार आहे. दरम्यान कुणबी पुराव्यांसाठी निजामकालीन पुरावे देखील शोधले जात आहेत.