संभाजीनगर (दत्ता कनवटे) : सध्या राजकीय वर्तुळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चर्चा आहे. या क्लिपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे 2024 निवडणुकीपर्यंत पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी काय करायच ते कार्यकर्त्यांना सांगतायत. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ते म्हणताना ऐकू येतय. अहमदनगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील ही क्लिप असल्याच बोलल जातय. चंद्रशेखर बावनकुळे यांची ही कथिक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.
आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. “चंद्रशेखर बावनकुळे हे वाचळवीर आहेत. चहा कुणाला पाजायचा हे कार्यकर्त्यांना माहिती असतं, पत्रकारांना कसं सांभाळायचं हे माहिती असतं, बावनकुळे हे कधीही काहीही बोलतात, नॉलेज नसताना बडबड करतात” अशी टीका खैरे यांनी केली. “हे फुटलेले गद्दार लोक काहीही करतात, कुणी तोंडात मारते, कुणी दारू प्या म्हणते, कुणीही काहीही बोलतात, त्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारणार नाही, मला देवेंद्रजींना प्रश्न विचारतो की देवेंद्रजी हे लोक कसे आवडतात प्रतिमा निर्माण करणे हे हास्यास्पद आहे” असं खैरे म्हणाले.
ठाणे हवे असेल तर हे वाद होणारच
“नामांतरविरोधात काहीही याचिका टाकली तरी काहीही होणार नाही, भाजपची बी टीम वाद निर्माण होण्यासाठी या याचिका टाकत असतात, पण त्याचा काहीही उपयोग नाही. भाजपला ठाणे हवे असेल तर हे वाद होणारच, कमळावर उभं राहा यासाठी सुद्धा भाजप प्रयत्न करतय. भाजप खरोखर फुटण्याची शक्यता आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.