सांगली : गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच सांगलीतील शहरातील बस स्थानकातही पाणी साचले आहे. (Sangli Krishna River water level has reached 54 feet)
कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पात्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीचे पात्र विखुरले गेले आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदीचे पात्र रौद्ररुप आणि विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले आहे.
मदत न मिळाल्याने नागरिक नाराज
सांगलीत पुराचा धोका कायम आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक पूल आणि 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोडवर पाणीच पाणी झालं आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत. मात्र अद्याप प्रशासनानं मदत न मिळाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाहा व्हिडीओ :
(Sangli Krishna River water level has reached 54 feet)
संबंधित बातम्या :
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
VIDEO | कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर
Chiplun Flood | चिपळूणमध्ये पुराची पाणीपातळी चार-पाच फुटांनी खाली, पावसाची रिमझिम सुरु