मुंबई : सांगली आणि कोल्हापुरातील जिल्ह्यात वारंवार पूर (Sangli Kolhapur Flood) येतो. त्यांच्या पाण्याचा पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. पाणीवाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, म्हणून हे सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेनेही (World Bank) सहमती दर्शवली आहे. जे पाणी समुद्रात वाहून जाते आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता. पण हे काम काही दिवसांपासून रखडले होते. हा प्रकल्प परत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जे पाणी समुद्रात वाहून जाते आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता. पण हे काम काही दिवसांपासून रखडले होते. हा प्रकल्प परत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रालयात पार एक बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी जागतिक बँकेचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्षांपासून पूर येत आहे. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला जागतिक बँक मदत करणार आहे.
सांगली आणि कोल्हापुरातील जिल्ह्यात वारंवार पूर येतो. त्यांच्या पाण्याचा पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. पाणीवाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, म्हणून हे सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे.