शिवसेना एकच… बाकी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं…संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना डिवचले

| Updated on: Oct 05, 2024 | 4:54 PM

निवडणुका आल्या आहेत. निवडणुका आल्यावर अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका होतो. निवडणुका आल्यावर असे छापे पडतात. कुठे छापे पडले माहीत नाही. दहा वर्ष तुम्ही काय करता. निवडणुका आल्या, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आला की अतिरेकी पकडतात.

शिवसेना एकच... बाकी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं...संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना डिवचले
Follow us on

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या हातातील बाहुले झाल्याचा आशय त्यांनी आपल्या टीकेतून मांडला. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिकीट आता दिल्लीत फायनल होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत

दिल्लीत आमचे तिकीट फायनल होत नाही. आमचे पक्षप्रमुख मुंबईत राहतात. मातोश्रीवर असतात. सर्व महाराष्ट्र मातोश्रीवर येतो. दिल्लीत शरद पवार गटाचे तिकीट कन्फर्म होत नाहीत. दिल्लीत शिंदे गटाचे तिकीट कन्फर्म होतात. दिल्लीत अजित पवार गटाचे तिकीट कन्फर्म होतात. कारण त्यांचे बॉस दिल्लीत असतात. आमची नाहीत. आमचे शिवसेना पक्षप्रमुख मुंबईत आहेत. आमचं सर्व काम मुंबईतून चालतं.

आरक्षणाचा मुद्दा राज्यातील संपवायचा असेल तर तामिळनाडूचा फॉर्म्युला आहे. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण दिलं ते टिकलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत. सर्वांना हळद लावत आहेत. तुलाही देतो सांगत आहे. त्यांच्या हातात काही नाही. मोदी आणि शाह यांच्या हातात आहे. दिल्लीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. जे परवा शरद पवार आणि आता राहुल गांधी यांनी तेच सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

ही शिवसेना नाही….

शिवसेना एकच. बाकी सर्व मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं आहेत. जुनी नवी असं काही नाही. शिंदे आणि त्यांचा फुटलेला गट हा भाजपच्या झाडाला लागलेलं बांडगुळ आहे. मोदी आज आले. मोदींचा फोटो पोस्टरवर मोठा आहे पण बाळासाहेबांचा फोटो छोटा आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर बाळासाहेबांशिवाय कुणाचा फोटो नव्हता. त्यांच्या फोटोवर मोदी आणि शाह यांचे फोटो आहेत. ही शिवसेना नाही. त्यांना शिवसेना म्हणणं हा बाळासाहेबांचा अवमान आहे

निवडणुका आल्यावर छापे पडतात…

निवडणुका आल्या आहेत. निवडणुका आल्यावर अचानक राष्ट्रीय सुरक्षेला धोका होतो. निवडणुका आल्यावर असे छापे पडतात. कुठे छापे पडले माहीत नाही. दहा वर्ष तुम्ही काय करता. निवडणुका आल्या, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आला की अतिरेकी पकडतात. त्याच दिवशी पकडतात. निवडणूक आल्यावर छापे मारून वातावरण बदलून टाकायचं. त्याला लोक कंटाळली आहे.

अजित पवारांवर टोलेबाजी

मोदींच्या गुजरातमध्ये अदानीच्या पोर्टवर पाच वर्षात ३८ लाख कोटींचं ड्रग्ज पकडलं आहे. ईराण अफगाणिस्तानातून आलं. त्यावर कारवाई नाही. राज्यात भाजपचं राज्य. ललित पाटील पकडला. त्याच्यावर कारवाई केली नाही. वडील सत्तरीच्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, असे काहीजण म्हणतात. ते म्हणतात, वडील ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा कशासाठी? पण त्यांनी हा सल्ला शरद पवार यांना देण्यापेक्षा 95 वर्षांच्या मोदींना द्यावा, असा टोला अजित पवार यांना लगावला.