लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशानंतर महाविकास आघाडीत शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवयला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला, असे संजय राऊत यांनी म्हटले. शरद पवार विधान सभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणतात, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यांचा थैल्या आणि खोकेचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांनी पैशाने स्ट्राईक रेट घेतला आहे. त्यांनी मुंबईची जागा लुटली. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. त्यासंदर्भात बैठक ठरलेली होती. परंतु काँग्रेसची दिल्लीत बैठक आहे. यामुळे बैठकीसाठी पुढली तारीख ठरवू.
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा केला. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नाका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पैसे वाटपाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर शिक्षक या वर्गात बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहता आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्र प्रमाणे हे सर्व पाहत आहे. दिंडोरीत भगरे नावाचा उमेदवार उभा केला. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे हा उमेदवार दिला. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांना फसवणूक करुन मत घेतले जात आहे.
डमी उमेदवार पद्धत बंद व्हायला पाहिजे. लोकांना भ्रमित केले जाते आणि मते घेतली जातात. यातून मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिले जाते. आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो. लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाणला मत दिली होती. त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.