PHOTO | संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधी शिवसेना भवनात प्रचंड गर्दी, पहा क्षणचित्र!

| Updated on: Feb 15, 2022 | 4:36 PM

भाजपच्या ज्या साडेतीन लोकांवर संजय राऊत आरोप करणार होते, ते नेमके कोण आहेत, याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. त्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शिवसेना भवनाबाहेर गर्दी केली होती. संजय राऊत यांना गाडीतून बाहेर पडणे कठीण झाले होते.

PHOTO | संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधी शिवसेना भवनात प्रचंड गर्दी, पहा क्षणचित्र!
Follow us on

मुंबईः मुंबईतील शिवसेना भवनात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगण्यात आलं. तेव्हापासून मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर (Shiv Sena Bhavan) कार्यकर्त्यांचा प्रचंड जमाव गोळा होऊ लागला. दुपारी चार वाजता संजय राऊत पत्रकार परिषद घेणार होते. त्या आधी शिवसेना आघाडीचे कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमले होते. संजय राऊत आज भाजपाविरोधात कोणता बॉम्ब टाकणार, याविषयीची उत्सुकता सर्वांना लागली होती. भाजपच्या (BJP) ज्या साडेतीन लोकांवर संजय राऊत आरोप करणार होते, ते नेमके कोण आहेत, याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास संजय राऊत शिवसेना भवनात आले. तेव्हा या गर्दीतून वाट काढत सेना भवनात जाणे त्यांना कठीण जात होते.

शिवसेना भवनाबाहेर प्रचंड गर्दी असल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने संजय राऊत गाडीतून उतरले. मागील बाजूने शिवसेना भवनात पोहोचले. दादरमधल्या शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

संजय राऊत शिवसेना भवनात येण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. यावेळी, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, अशी घोषणाबाजी होत होती.

दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास संजय राऊत शिवसेना भवनात आले. तेव्हा या गर्दीतून वाट काढत सेना भवनात जाणे त्यांना कठीण जात होते. गाडीतून बाहेर येताच संजय राऊत यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले.

भाजपच्या ज्या साडेतीन लोकांवर संजय राऊत आरोप करणार होते, ते नेमके कोण आहेत, याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. त्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शिवसेना भवनाबाहेर गर्दी केली होती. संजय राऊत यांना गाडीतून बाहेर पडणे कठीण झाले होते.

इतर बातम्या-

E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?

Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले