मुंबईः गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा, ही राहुल (Rahul Gandhi) आणि प्रियांका यांची इच्छा असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले, तर कुणावर शरसंधान साधले. त्यामुळे येणाऱ्या काळात ही मुलाखत चांगलीच चर्चेत राहणार आहे, यात शंकाच नाही.
काय म्हणाले राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात भाजपला कधीच बहुमत मिळालं नाही. यावेळीही मिळणार नाही. भाजपच्या सरकारविषयी त्यांच्या कारभाराविषयी गोव्यातील जनतेला प्रचंड राग आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, गोव्यात महाविकास आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. काँग्रेसची आहे का? राहुल गांधींची इच्छा आहे. प्रियांका गांधींची इच्छा आहे. गोव्यात आघाडी व्हावी. पण स्थानिक लोकं आहेत, त्यांच्याशी सतत बोलतो. त्यांचा राष्ट्रीय राजकारणाशी किती कनेक्ट आहे हे माहीत नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राऊत म्हणाले, गोव्यात काँग्रेसला संपूर्णपणे संपवण्याचं काम सुरू आहे. गोव्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने संयमाची आणि समंजसपणाची भूमिका घेतली, तर आम्ही सर्व एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं राज्य स्थापन करू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
ती पक्षाची भूमिका नाही…
राज्यातील एक राज्यमंत्री आमचे सहकारी आहेत. मात्र, ते शिवसेनेची भूमिका मांडत नाही. ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत. तुम्ही चर्चा करता म्हणून चर्चा होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. कालही त्यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांशी झूमद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांशीही झूमद्वारे संवाद साधतात. शेवटी व्यक्ती दिसतेच ना समोर. व्यक्ती आदेश देते, सूचना करते, बोलते यालाच राज्यकारभार करणं म्हणतात. फायलींवर सह्या होत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या जात आहे. राज्यावर लक्ष आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे आणि काय करत आहे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड
Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?