मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांचं काल मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. शिवसैनिकांनी (shivsainik) त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी राऊत प्रचंड आनंदात दिसत होते. सर्वांशी हसून हात मिळवत होते. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर (bjp) घणाघाती हल्ला केला. अत्यंत आक्रमकपणे राऊत काल बोलत होते. आज मात्र, जेव्हा मीडियांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा राऊत संतापलेले दिसले. राऊत पत्रकारांनाच तावातावाने बोलत होते. हातवारेही करताना दिसत होते. मला टू द पॉईंट काय असेल ते विचारा. इकडची तिकडची झाडे हलवत बसू नका, असं राऊत म्हणत होते. राऊतांचा हा रुद्रावतार पाहून पत्रकारांनाही आश्चर्य वाटलं. राऊत यांना एवढा राग कशाचा आला याचीच चर्चा पत्रकारांमध्ये होती.
संजय राऊत आज सकाळी माध्यमांसमोर आले. तेव्हा एका पत्रकाराने त्यांच्यासमोर बूम धरला. त्यावर राऊत भडकले. खाली घ्या खाली. (हातवारे करत) मला हवंय ते मी बोलेन. तुम्हाला हवंय ते मी नाही बोलणार. काय आहे विषय? असा सवाल राऊत यांनी केला. त्यानंतर त्यांना तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, त्याबद्दल सांगा असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटतो. पुढे बोला, असं म्हणून राऊतांनी हा प्रश्न उडवून लावला. मला टू द पॉइंट काय असेल ते विचारा, इकडले तिकडले झाडे हलवत बसायचे नाही, असंही राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांचा पारा चढलेला होता.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी स्टेटमेंट रेकॉर्ड होणार असल्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, मला माहीत आहे. मी परवाच राज्यसभेत गृहमंत्री शहांना एक प्रश्न विचारला. केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का? केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नाही का? हे आमच्या डोळ्यात डोळे घालून बोला, असं मी शहांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, मी डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
तेव्हाही मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला. रश्मी शुक्ला या बाईसाहेब कुणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या सर्वांना माहीत आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे आमचे फोन टॅपिंग करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. सरकार बनवण्याच्या काळातील या गोष्टी आहेत. हा सुरक्षेचा विषय होता. पण केंद्राच्या मदतीने हे झालं. मला पोलीस चौकशीसाठी बोलवत असतील तर मला जायला हरकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या: